शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सायको किलरचा पुन्हा हैदोस : दोन महिलांवर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 20:11 IST

दोन वर्षांपूर्वी नागपुरातील महिलांवर चाकू हल्ला करून प्रचंड दहशत निर्माण करणारा आणि पोलीस सक्रिय झाल्यामुळे रहस्यमयरीत्या गायब झालेला सायको किलर आज भल्या सकाळी पुन्हा सक्रिय झाला. त्याने पाच मिनिटात मालू राऊत आणि सविता मानेकर नामक दोन महिलांवर चाकूहल्ला करून त्यांना जबर जखमी केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ६ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने उपराजधानीत पुन्हा एकदा थरार निर्माण झाला आहे. दरम्यान, यापूर्वी महिलांवर हल्ला करण्याची पद्धत आणि वेळ तसेच पद्धत बघता हा जुनाच सायको किलर असावा, असा संशय आहे.

ठळक मुद्दे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन वर्षांपूर्वी नागपुरातील महिलांवर चाकू हल्ला करून प्रचंड दहशत निर्माण करणारा आणि पोलीस सक्रिय झाल्यामुळे रहस्यमयरीत्या गायब झालेला सायको किलर आज भल्या सकाळी पुन्हा सक्रिय झाला. त्याने पाच मिनिटात मालू राऊत आणि सविता मानेकर नामक दोन महिलांवर चाकूहल्ला करून त्यांना जबर जखमी केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ६ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने उपराजधानीत पुन्हा एकदा थरार निर्माण झाला आहे. 

शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास अयोध्यानगर जवळच्या शारदा चौक परिसरात एक महिला साफसफाई करीत होती. तर दुसरी मॉर्निंग वॉक करीत होती. अचानक दुचाकीवर आलेल्या सायको किलरने एकीच्या खांद्याजवळ तर ३०० मीटर अंतरावरील दुसरीच्या पाठीवर चाकू मारून शिवीगाळ करीत पळ काढला. अचानक झालेल्या चाकू हल्ल्यामुळे दोन्ही महिला प्रचंड घाबरल्या. त्या आरडाओरड करू लागल्या. यावेळी परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची मोठी गर्दी होती. 
सीसीटीव्ही फुटेज निकामीया भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात समोरच्या कॅमेºयात सायको किलरच्या दुचाकीच्या हेडलाईटचा तीव्र प्रकाशझोत कॅमेऱ्यावर येत असल्यामुळे स्पष्ट असे काहीच दिसत नाही. त्यामुळे मागच्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज पोलीस तपासत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिला