शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा रुग्णसंख्येचा उच्चांक, ६३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 23:44 IST

कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी पुन्हा एकदा उच्चांक गाठला. तब्बल ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या आता १२०५वर पोहचली आहे.

ठळक मुद्देरुग्णांची संख्या १२०५ : त्रिमूर्ती नगरातही कोरोनाचा शिरकाव : चंद्रमणीनगर, काटोल चौक, हंसापुरी, मोमीनपुरात सर्वाधिक रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी पुन्हा एकदा उच्चांक गाठला. तब्बल ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या आता १२०५वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, रात्री एम्समध्ये तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ४३ रुग्णांचे निदान झाले. यातील बहुसंख्य रुग्ण हे चंद्रमणीनगर, काटोल चौक, हंसापुरी व मोमीनपुरा वसहतीतील आहेत. या महिन्यात चारदा रुग्णांचा आकडा ५० वर गेला. आतापर्यंत सर्वाधिक ८६ रुग्णांची नोंदही याच महिन्यात झाली आहे. विशेष म्हणजे, त्रिमूर्ती नगरातही आता कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.लॉकडाऊन अनलॉक होताच नव्या वसाहतींमधून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज मेयोच्या प्रयोगशाळेत बजेरिया, नाईक तलाव-बांगलादेश, हंसापुरी व लष्करीबाग येथील प्रत्येकी एक रुग्ण, सिम्बॉयसिसमध्ये उपचार घेत असलेले दोन तर हिंगणा येथील शिक्षक कॉलनी येथून तीन असे नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेडिकलच्या प्रयोगशाळेतून झिंगाबाई टाकळी येथून एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. नीरीच्या प्रयोगशाळेतून वायुसेनानगर येथील चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. खासगी प्रयोगशाळेतून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात तीन रुग्ण प्रीतम विहार कॉलनी, ऑटोमोटिव्ह चौक कामठी रोड येथील आहेत. दोन रुग्ण त्रिमूर्ती नगर, तर एक रुग्ण गडचिरोली येथील आहे. हा रुग्ण नागपुरात उपचारासाठी आला असताना अहवाल पॉझिटिव्ह आला. एम्सने रात्रीपर्यंत ७५ नमुने तपासले असता यातील ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व रुग्ण पाचपावली क्वारंंटाईन सेंटरमधील आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे चंद्रमणीनगर, काटोल चौक, हंसापुरी व मोमीनपुरा वसाहतीतील असल्याचे सांगण्यात येते.ग्रामीणमध्ये सात रुग्ण पॉझिटिव्हशहरात रुग्णांचा धडाका सुरू असताना नागपूरच्या ग्रामीण भागामध्येही रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. आज कामठी खैरी येथे तीन, कळमेश्वर ब्राह्मणी येथे एक तर वानाडोंगरी येथे तीन असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आले. कळमेश्वर-ब्राह्मणी येथे पहिल्यांदाच कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई येथून हा रुग्ण कुटुंबासह कळमेश्वरमध्ये आला असल्याची माहिती आहे. कामठी खैरी येथील एका खासगी कंपनीत तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. हे तिन्ही मजूर दिल्लीवरून १४ जून रोजी आले. तेव्हापासून ते कंपनीमध्येच आयसोलेशन कक्षात होते. कंपनी व लगतची वसाहत सील केल्याचे सांगण्यात येते.४२ रुग्णांना डिस्चार्जमेयोमधून २९ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात नाईक तलाव-बांगलादेश येथील १६, इसासनी येथील २, सतरंजीपुरा येथील १, प्रेमनगर येथील ४, लष्करीबाग येथील १, भानखेडा येथील १, हिंगणा येथील २, मोमीनपुरा येथील १ तर कोरोडा येथील १ रुग्णाचा समावेश आहे. मेडिकलमधून १३ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात रुग्ण नाईक तलाव-बांगलादेश येथील पाच, मोमनपुरा येथील दोन, हंसापुरी येथील एक, अजनी येथील दोन, मोमीनपुरा येथील दोन तर टिमकी येथील एक रुग्ण आहे.दैनिक संशयित २७८दैनिक तपासणी नमुने ३२८दैनिक निगेटिव्ह नमुने २७१नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १२०५नागपुरातील मृत्यू १८डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ८१२डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३७६५क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २५८२पीडित- १२०५दुरुस्त-७७०मृत्यू-१८

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर