शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Corona virus : नागपुरात पुन्हा ३६ संशयिताचे नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 21:43 IST

तीन आठवड्यात ४५१ संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी पुन्हा ३६ नमुन्यात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत ४५१ संशयित : तीन आठवड्यानंतरही चारच पॉझिटिव्ह

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : तीन आठवड्यात ४५१ संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी पुन्हा ३६ नमुन्यात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचे आज पुन्हा नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. गुरुवारी नमुना निगेटिव्ह आल्यास कोरोना मुक्त होणारा मध्य भारतातील पहिला रुग्ण ठरेल. विशेष म्हणजे, या रुग्णाच्या पत्नीला व आणखी एका पुरुष रुग्णाला उद्या १४ दिवस पूर्ण होत आहे. त्यांच्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. जगभरात तांडव माजवणाऱ्या या विषाणूचा शिरकाव नागपुरात होताच, जिल्हा प्रशासनाने व वैद्यकीय यंत्रणेने तातडीने उपाययोजना केल्यात. यामुळे २१ दिवसाचा कालावधी होऊनही बाधित रुग्णांची संख्या चारवरच स्थिर आहे. त्यानंतर तपासण्यात आलेले सर्वच नमुने निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी पहिल्या टप्प्यात मेयोच्या प्रयोगशाळेला ३६ नमुने प्राप्त झालेत. यात मेयोमधून ११, मेडिकलमधून ६, महानगरपालिकेमधून ८, यवतमाळ, सावंगी मेघे वर्धा, गोंदिया, बुलडाणा, गडचिरोली व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमधून प्रत्येकी १ तर अमरावतीमधून ५ असे ३६ नमुने आले. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले. यामुळे कोरोना विषाणूच्या लढाईत यश येऊ पाहत आहे. लोकांनी पुढील २० दिवस घरीच थांबल्यास सकारात्मक चित्र दिसून येण्याचीही शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. होम कारन्टाइन मेयो, मेडिकलमध्ये संशयित म्हणून दाखल झालेल्या आतापर्यंत २२२ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले तरी त्यांना १४ दिवस होम कारन्टाइन करून ठेवण्यात आले आहे. यातील ४७ संशयितांना १४ दिवसानंतरही कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. परंतु त्यानंतरही खबरदारीचे उपाय म्हणून त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मेयो, मेडिकलमध्ये १० संशयित रुग्णांची बुधवारी मेयोमध्ये आणखी ८ संशयित रुग्ण दाखल झाले तर मेडिकलमध्ये दोन रुग्ण दाखल झाले आहेत. यात एक पुरुष व एक महिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत ११२३ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. सध्या १६५ प्रवासी विलगीकरण कक्षात आहेत. आज २३ प्रवाशांना या कक्षातून घरी पाठविण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर