शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा तीन गर्भवतीसह ११ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३१५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 22:54 IST

मंगळवारी तीन गर्भवती महिलांची नोंद झाली असताना आज बुधवारी पुन्हा तीन गर्भवती महिलांचे निदान झाले. गर्भवती मातांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ३१५ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देदोन लहान मुलांसह बाळंतीणीची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी तीन गर्भवती महिलांची नोंद झाली असताना आज बुधवारी पुन्हा तीन गर्भवती महिलांचे निदान झाले. गर्भवती मातांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ३१५ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, एका बाळंतीणीने कोरोनावर मात करीत सलग १५ दिवसानंतर बाळाला कुशीत घेतले. आज बरे झालेल्यांची संख्या १० असून एकूण ११२ रुग्ण कोरोनामुक्त झाले.नागपुरात गेल्या दोन महिन्यात १३ गर्भवती महिलांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह गर्भवती महिलेवर उपचारादरम्यान इतरांनाही लागण होऊ नये म्हणून या महिलांची तातडीने चाचणी करण्याचा सूचना आहेत. विशेष म्हणजे तीन आठवड्यांपूर्वी अशाच एका महिलेची प्रसुतीनंतर तिचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन व्हावे लागले होेते. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा महिलांच्या नमुन्यांची युद्धपातळीवर चाचणी करण्याचा सूचना आहेत. रेड झोनमध्ये तर अशा महिलांची त्यांच्या वसाहतीत जाऊन तपासणी केली जात आहे. सोमवारी मोमीनपुरामध्ये तपासणी करण्यात आलेल्या ६० महिलांमध्ये तीन गर्भवती महिला पॉझिटिव्ह आल्या. याच भागातील काही नमुने माफसू प्रयोगशाळेत आज तपासण्या आले असता पाच नमुने पॉझिटिव्ह आले. यात पुन्हा तीन महिला गर्भवती तर ६० व ७५ वर्षीय महिला आहे. या पाचही महिला मोमीनपुरा येथील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले नव्हते. एम्सच्या प्रयोगशाळेत एका खासगी हॉस्पिटलमधील ३९ वर्षीय वॉर्ड बॉयचा नमुना पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण मोमीनपुरा येथील रहिवासी आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेत एक पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा सतरंजीपुरा येथील रहिवासी आहे. या रुग्णाला व्हीएनआयटीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. मेयोच्या प्रयोगशाळेत चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. सर्व रुग्ण मोमीनपुरातील असून पाचपावली येथे क्वारंटाईन होते.मेयो व मेडिकलमधून प्रत्येकी पाच रुग्ण बरेमेयोमधून एका बाळंतीणीसह पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात मोमीनपुरा येथील २८ वर्षीय बाळंतीण तर सतरंजीपुरा येथील ३३, ४५ वर्षीय महिला, २८ व ३९ वर्षीय पुरुष आहे. मेडिकलमधील दोन वर्षाचा मुलगा व तीन वर्षाच्या मुलीसह पाच जणांनी कोरोनाला हरविले. यात ३५ वर्षीय महिला ही शांतिनगर येथील असून उर्वरीत मोमीनपुरा येथील रहिवासी आहेत.खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह ५०वर क्वारंटाईनकमाल टॉकीज, शंकरनगर व डिगडोह येथील खासगी हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या एका महिला रुग्णाने उपचार घेतल्याने येथील डॉक्टरांसह, परिचारिका व कर्मचारी अशा ५० लोकांना एका खासगी हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. विशेष म्हणजे, कमाल टॉकीज येथील खासगी हॉस्पिटलमधील एक वॉर्ड बॉय पॉझिटिव्ह आला आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १०३दैनिक तपासणी नमुने ५००दैनिक निगेटिव्ह नमुने ४८९नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ३१५नागपुरातील मृत्यू ४डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ११२डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १८०२क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २२५३पीडित-३१५-दुरुस्त-११२-मृत्यू-४

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याpregnant womanगर्भवती महिला