शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

नागपुरात मुलीचा विनयभंग करणाऱ्या  आरोपीला दोन वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 22:29 IST

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या  एका आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाचे न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देपोक्सो विशेष न्यायालयाने सुनावला निकालआरोपीच्या दंडाच्या रकमेतून पीडितेला नुकसान भरपाई

आॅनलाईन लोकमतनागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या  एका आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाचे न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून २ हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.सोनू सुरेश यादव (२२) रा. हिवरीनगर झोपडपट्टी, असे आरोपीचे नाव आहे.पीडित मुलीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी २५ नोव्हेंबर २०१३ रोजी भादंविच्या ३५४-डी, ५०४, ५०६-बी आणि लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) १२ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.खटल्याची पार्श्वभूमी अशी की, गुन्हा दाखल होण्याच्या एक महिन्यापूर्वीपासून आरोपी हा पीडित मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. तो तिला टॉन्टिंग करायचा. तू मला खूप आवडते, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे तो म्हणायचा. ती कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून आरोपीने पीडित मुलीच्या आईसोबत मोबाईलवर संपर्क साधला होता. तिने त्याची समजूत काढली होती.२४ नोव्हेंबर रोजी आरोपीने पीडित मुलीच्या घरासमोर येऊन तिच्याशी भांडण केले होते. त्याने तिला आणि तिच्या मामालाही मारहाण केली होती. त्याने तिच्या घारातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३५४-डी कलमांतर्गत २ वर्षे सश्रम कारावास, १ हजार रुपये दंड, ५०४ कलमांतर्गत १ वर्ष सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, ५०६ (भाग २) कलमांतर्गत २ वर्षे कारावास, १ हजार रुपये दंड, ३२३ कलमांतर्गत ६ महिने कारावास, ५०० रुपये दंड, पोक्सोच्या कलम १२ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास, १ हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा आरोपीला एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारतर्फे सहायक सरकारी वकील वर्षा आगलावे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. पी. पी. पात्रीकर यांनी काम पाहिले.

 

 

 

 

 

टॅग्स :Courtन्यायालय