शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात अपघाताच्या प्रमाणात ९.५४ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:08 IST

नागपूर शहरात २०१७ मध्ये १२४२ अपघात झाले असून, यात २३१ नागरिकांचा मृत्यू झाला तर १२५६ जखमी झाले. परंतु गेल्या वर्षी अपघातांना घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे प्रथमच अपघाताची संख्या कमी झाली. अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी घटले.

ठळक मुद्दे२०१६ मध्ये १३७३ तर २०१७ मध्ये १२४२ अपघात

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही रस्ता वापरणाऱ्या घटकांनी याबाबत गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसत नाही. नागपूर शहरात २०१७ मध्ये १२४२ अपघात झाले असून, यात २३१ नागरिकांचा मृत्यू झाला तर १२५६ जखमी झाले. परंतु गेल्या वर्षी अपघातांना घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे प्रथमच अपघाताची संख्या कमी झाली. अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी घटले.वाढत्या शहरीकरणामुळे मुख्य रस्तेच नाही तर वसाहतीमधील रस्त्यांवरील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्रमण व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होत चालली आहे, शिवाय प्रदूषणामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये नागपूर शहरात १३७३ अपघात झाले होते. यात ३०७ मृत्यू तर १५१० नागरिक जखमी झाले. २०१५ च्या तुलनेत अपघाताचा हा आकडा ४.८१ टक्क्यांनी वाढला होता.आठ वर्षांत पहिल्यांदाच प्रमाण घटलेनागपूर शहरात २०१३ मध्ये १०२९, २०१४ मध्ये ११४८ अपघात झाले. अपघाताचे हे प्रमाण ११.५६ टक्क्यांनी वाढले होते. २०१५ मध्ये १३१० अपघात होऊन यात १४.११ टक्क्यांनी वाढ झाली. २०१६ मध्ये १३७३ अपघात होऊन प्रमाण ४.८१ टक्क्यांपर्यंत पोहचले. मात्र २०१७ मध्ये १२४२ अपघात होऊन अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी कमी झाले. गेल्या आठ वर्षात पहिल्यांदाच अपघाताची संख्या घटली.मृत्यूचे प्रमाण २४.७६रस्ते अपघातात २०१३ मध्ये २४८ तर २०१४ मध्ये २८६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. हे प्रमाण १५.३२ टक्के एवढे होते. २०१५ मध्ये रस्ता अपघातातील मृत्यूचे हे प्रमाण ८.३९ टक्क्यांनी कमी झाले. त्यावर्षी २६२ नागरिकांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये पुन्हा अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढले. ३९७ मृत्यूची नोंद झाली. १७.१८ टक्क्यांनी हे प्रमाण वाढले होते. मात्र २०१७ मध्ये मृत्यूचे प्रमाण २४.७६ टक्क्यांनी घसरले. या वर्षात २३१ मृत्यू झाले.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर