शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर एसीबी एसपी पाटील यांची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 22:43 IST

महिला पोलीस शिपायाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेले एसीबीचे एसपी प्रद्युम्न (पीआर) पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांना तडकाफडकी मुंबई मुख्यालयात हजर होण्याचे निर्देश एका आदेशातून जारी करण्यात आले. तर, त्यांच्या रिक्त पदावर अमरावती एसीबीचे एसपी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली.

ठळक मुद्देमुंबई मुख्यालयात बदली : अमरावती एसपींची नागपुरात वर्णी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला पोलीस शिपायाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेले एसीबीचे एसपी प्रद्युम्न (पीआर) पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांना तडकाफडकी मुंबई मुख्यालयात हजर होण्याचे निर्देश एका आदेशातून जारी करण्यात आले. तर, त्यांच्या रिक्त पदावर अमरावती एसीबीचे एसपी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली.पाटील शरीरसुखाची मागणी करून अक्षरश: छळ करतात, अशी तक्रार पीडित महिला कर्मचाऱ्याने थेट पोलीस महासंचालक (एसीबी) संजय बर्वे यांच्याकडे पाठवली होती. त्याची गंभीर दखल घेत बर्वे यांनी विशाखा समितीकडून चौकशी करून घेतली. त्यासाठी १५ दिवसांपूर्वी मुंबईहून एसीबीची चौकशी समिती नागपुरात आली होती. त्यांनी तक्रारीची चौकशी करून पुन्हा मुंबई गाठली. चौकशीत भक्कम पुराव्याची साखळी मिळाल्याने पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार, मंगळवारी, ४ डिसेंबरला मुंबई एसीबीच्या मुख्यालयातून आलेल्या महिला एसीपीने पीडित महिला पोलीस शिपायाला सोबत घेऊन सदर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे राज्याच्या एसीबीत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होताच एसपी पाटील १५ दिवसांच्या रजेचा अर्ज देऊन कार्यालयातून निघून गेले. पोलीस पथक त्यांची शोधाशोध करीत असतानाच त्यांनी गुुरुवारी कोर्टात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी वकिलामार्फत अर्ज दिला. आज त्यांना जामीन मिळाला तर, इकडे एसीबी कार्यालयात तातडीचा संदेश आला. त्यानुसार, एसपी पाटील यांची एसीबीच्या मुंबई मुख्यालयात बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदावर अमरावती परिक्षेत्राचे एसपी धिवरे यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले. हे आदेश मिळताच धिवरे नागपुरात पोहचले आणि त्यांनी पदभार सांभाळला.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागTransferबदली