नागपुरात ७५ परिसर सील, १३ परिसरांची व्याप्ती कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 12:15 AM2020-08-02T00:15:05+5:302020-08-02T00:16:22+5:30

शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून प्रतिबंधित क्षेत्रातही मोठी वाढ होत आहे. शनिवारी तब्बल ७५ परिसर सील करण्यात आले. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात परिसर सील करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. दरम्यान, १३ परिसररांची प्रतिबंधित व्याप्ती कमी करण्यात आली आहे.

In Nagpur, 75 areas are sealed, 13 areas are less | नागपुरात ७५ परिसर सील, १३ परिसरांची व्याप्ती कमी

नागपुरात ७५ परिसर सील, १३ परिसरांची व्याप्ती कमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून प्रतिबंधित क्षेत्रातही मोठी वाढ होत आहे. शनिवारी तब्बल ७५ परिसर सील करण्यात आले. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात परिसर सील करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. दरम्यान, १३ परिसररांची प्रतिबंधित व्याप्ती कमी करण्यात आली आहे.
नव्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये म्हाडा कॉलनी संत गाडगेनगर हिंगणा रोड, अरिहंत आर्केड २ विंग मंगलधाम सोसायटी, बाभडे ले-आऊट, भामटी, वैनगंगानगर, चुनाभट्टी रोड इमारत क्रमांक सी-तळ मजला, तात्या टोपेनगर येथील अमेय अपार्टमेंट, आझाद हिंदनगर जयताळा रोड,
जयप्रकाशनगर, धरमपेठ झेंडा चौक येथील गणेश भवन, शिवाजीनगर येथील मालती मेन्शन अपार्टमेंट, बुद्धनगर युनिट-२, डॉ. अमोल मेश्राम यांचा दवाखाना, पंचशीलनगर-२, सुजातानगर, पंचशीलनगर वाचनालयाजवळ, रजत टॉवर कामठी रोड, राजगृहनगर, संतोष बाबा अपार्टमेंट-८ आरामशीन परिसर लष्करीबाग, गुरुनानकपुरा, कुकरेजा सनसिटी -बी विंग नारी रोड, चैतन्येश्वरनगर, सरस्वतीनगर, वैष्णवदेवीनगर, खंडवानी टाऊनजवळ, चिटणीसनगर, ओमनगर, छोटा ताजबाग प्रीती अपार्टमेंट, महाकाली शीतला माता मंदिर, राणी भोसलेनगर, श्रीनगर लेन नंबर -०२, ठाकूर प्लॉट मोठा ताजबाग, नंदनवन झोपडपट्टी क्रमांक १ जगनाडे चौक, रामकृष्णनगर, उमरेड रोड दिघोरी, खुरपुडे लॉनजवळ आदित्य किराणा समोर अंबानगर दिघोरी, स्मृतिनगर संतकृपा किराणा स्टोअर्स जवळ दिघोरी, योगेश्वरनगर, विद्यानगर औलियानगर, गाडगेनगर, हनुमानमंदिर जवळ, जामदार गल्ली जामदार शाळेजवळ, गाडीखाना दुर्गामाता मंदिर जवळ, नाईक रोड महाल, राहतेकर वाडी दसरा रोड गायत्री कॉन्व्हेंट, बापुराव गल्ली, भाऊजी दफ्तरी शाळेजवळ संघ बिल्डिंग महाल, कामगारनगर पोलीस लाईन टाकळी, टीचर्स कॉलनी, जाफरनगर, न्यू अहबाब कॉलनी महेशनगर, श्रीकृष्णधाम कोराडी रोड वॉक्स कूलरच्या मागे, न्यू गांधी ले-आऊट दत्तनगर, पंजाबी लाईन रेल्वे क्वॉर्टर, सुगंधी मंगल कार्यालयामागे मानकापूर, राष्टÑसंतनगर झिंगाबाई टाकळी, इरोज सोसायटी गोरेवाडा बसस्टॉप, गणपतीनगर शिव किराणा स्टोर झिंगाबाई टाकळी, मंगलानी झेरॉक्स जरीपटका मेन रोड, सुशीलानगर साई मंदिरजवळ, चावला चौक जरीपटका मेन रोड, नई वस्ती अपंग शाळेजवळ मंगळवारी बाजार सदर, ए.आर.सी. प्लाझा मोहननगर, कान्हा विहार गोकुल हाऊसिंग सोसायटी बोरगाव गोरेवाडा रोड, तिरुपती किराणा स्टोअर्स समोर दुर्गानगर भरतवाडा, भवानी माता मंदिर भवानीनगर कळमना, नागपुरे शाळेमागे साईनगर कॉलनी भरतवाडा, गणेश मंदिर परिसर भवानीनगर, सरईपुरा पारडी, आभानगर पुनापूर, हनुमाननगर भांडेवाडी, मारोती सोसायटी जय अंबेनगर भांडेवाडी, कळमना घाट रोड कामनानगर, पुरारामवाडी गल्ली नंबर १४ डिप्टी सिग्नल, पवनसुत हनुमान मंदिर जवळ सुभाननगर, मिनीमातानगर जेतवन बुद्धविहारजवळ, नेहरूनगर प्रजापतीनगरजवळ, प्रजापतीनगर रस्ता क्रमांक १ या परिसरांचा समावेश आहे.

Web Title: In Nagpur, 75 areas are sealed, 13 areas are less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.