शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भरती झाल्यानंतर २४ तासामध्ये मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 11:38 IST

नागपूर शहरात दररोज एक हजाराच्या आसपास कोविड रुग्ण आढळून येत असून ३० ते ४० लोकांचा मृत्यू होत आहे.

ठळक मुद्दे४८ तासात मृत्यूचे प्रमाण ३८ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील आठ-दहा दिवसापासून नागपूर शहरात दररोज एक हजाराच्या आसपास कोविड रुग्ण आढळून येत असून ३० ते ४० लोकांचा मृत्यू होत आहे. लक्षणे आढळून आल्यानंतर लगेच उपचार न घेता त्रास वाढल्यानंतर उपचारासाठी रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. यामुळे दाखल झाल्यानंतर २४ तासात मरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ४८५ मृत्यूपैकी ३०० रुग्णांचा मृत्यू उपचारासाठी दाखल झाल्यानंतर २४ तासात झाला तर ४८ तासात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ३८ टक्के आहे. वेळीच उपचार केले असते तर ही संख्या कमी राहिली असती, अशी माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना दिली.११ मार्च ते ३१ मे दरम्यान नागपूर शहरात रिकव्हरी रेट अधिक होता. परंतु जूनपासून परिस्थिती बदलली. ऑगस्ट महिन्यात परिस्थिती गंभीर बनली. याला नागरिकांची बेजबाबदार वागणूक प्रामुख्याने कारणीभूत आहे. लॉकडाउन कुणालाच नको आहे. दुसरीकडे नियमही पाळले जात नाही. बाजारात फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही. मास्कचा वापर होत नाही. तंबाखू व खर्रा खणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे. त्यांच्या थुंकण्यातून संसर्ग वाढण्याचा अधिक धोका आहे. यासाठी नागरिकांनी अंतर्मुख होण्याची गरज असल्याचे मत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.

काय म्हणाले तुकाराम मुंढे- २२ दिवसात ६२ हजार रुग्णांची तपासणी- ११ मार्च ते २२ऑगस्ट दरम्यान एक लाखाहून अधिक रुग्णांची तपासणी- नागपूर शहरात ३४ ठिकाणी कोविड ठिकाणी टेस्टिंग सेंटर- मृतांमध्ये ८५ टक्के जुने आजार असलेल्यांचा समावेश- ६० टक्के रुग्ण आजार गंभीर झाल्यानंतर उपचारासाठी दाखल होतात- ताप, सर्दी व खोकला असल्यास डॉक्टरकडे तपासणी करून घ्या.-प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून वर्तणूक सुधारावी.-अ‍ॅप डाऊनलोड करून मनपा प्रशासनाची मदत घ्या.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस