शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सहा दिवसात ४२५२ गुन्हेगारांचे ‘स्कॅन’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:09 IST

शहर पोलिसांनी आॅपरेशन ‘क्रॅक डाऊन’ अंतर्गत सहा दिवसात ४२५२ गुन्हेगारांची चौकशी, तपासणी अर्थात ‘स्कॅन’ केले आहे. पोलिसांनी ३२८ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे. शहर पोलिसांच्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देआॅपरेशन ‘क्रॅक डाऊन’ : गुन्हेगारांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : शहर पोलिसांनी आॅपरेशन ‘क्रॅक डाऊन’ अंतर्गत सहा दिवसात ४२५२ गुन्हेगारांची चौकशी, तपासणी अर्थात ‘स्कॅन’ केले आहे. पोलिसांनी ३२८ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे. शहर पोलिसांच्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी १५ नोव्हेंबरला ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन पार्ट-२’ला प्रारंभ केला. आयुक्तांच्या नेतृत्त्वात २० आॅगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन पार्ट-१’ मोहीम राबविण्यात आली होती. गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई, अवैध प्रकारे हत्याराचा उपयोग करणाऱ्यांना जेरबंद करणे, मारपीट अथवा लूटमारीच्या गुन्ह्यात लिप्त आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई, मादक पदार्थांच्या विक्रीत लिप्त आरोपींविरुद्ध कारवाई करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. याशिवाय अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. मोहिमेदरम्यान पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले आहे.‘आॅपरेशन क्रॅक डाऊन पार्ट-२’ अंतर्गत शहर पोलिसांनी सहा दिवसात गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. शहराच्या प्रत्येक ठाण्याच्या परिसरात सक्रिय गुन्हेगारांची ‘कुंडली’ पोलिसांनी तपासली आहे. तब्बल ४२५२ गुन्हेगारांची चौकशी केली आहे. गुन्हेगारीत सक्रिय असलेल्यांना शांत राहण्याचा इशारा दिला आहे. ३३८ गुन्हेगारांवर विभिन्न कलमांतर्गत कारवाई केली आहे. मादक पदार्थांच्या विक्री प्रकरणांत दोन गुन्हे नोंदविले आहेत. या दरम्यान फरार आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे. या मोहिमेमुळे गुन्हेगारीत सक्रिय असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ही मोहीम पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यामध्ये गुन्हे शाखा आणि शहरातील सर्व ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत.गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारगुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासह नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ मोहीम सुरू केली आहे. अवैध व्यवसायामुळे गुन्ह्याचा आलेख वाढतो. शहरात अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारांना जागा नाहीच. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये पोलिसांप्रति विश्वास संपादन करण्याचा मोहिमेचा उद्देश आहे. अशी मोहीम भविष्यातही राबविण्यात येणार आहे.डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त,नागपूर शहर.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNagpur Policeनागपूर पोलीस