शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

Nagpur | ४२३ गणेशोत्सव मंडळांचे अर्ज, २८९ जणांना परवानगी; विसर्जनासाठी ३५० कृत्रिम तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2022 14:44 IST

जाणून घ्या आपल्या घराजवळे विसर्जनस्थळ

नागपूर : उद्यापासून साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची नागपुरात जोरदार तयारी सुरू आहे. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने मंडळांचे कार्यकर्ते व भाविकांमध्ये प्रंचड उत्साह आहे. सोमवारपर्यंत ४२३ गणेश मंडळांनी मनपा प्रशासनाकडे परवानगीसाठी अर्ज केले होते. यातील २८९ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.

मनपाने चार फुटाहून अधिक उंचीची मूर्ती असलेल्या १९७ मंडळांना तर चार फुटापेक्षा कमी उंचीची मूर्ती असलेल्या ९२ मंडळांना मंजुरी दिली आहे. परवानगीसाठी झोन स्तरावर एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. मनपाने शहरात झोननिहाय गणेश विसर्जनासाठी ३५० कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे.

शहरात झोननिहाय विविध भागात तसेच चौकाचौकात व मैदानात कृत्रिम तलाव लावण्यात येणार आहेत. शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर या प्रमुख तलावांसोबतच अन्य तलावांवर लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात येणार आहे.

झोननिहाय कृत्रिम तलावांची संख्या

लक्ष्मीनगर - ३४

धरमपेठ - ६३

हनुमाननगर - ४४

धंतोली - ३६

नेहरूनगर - ४४

गांधीबाग - ३८

सतरंजीपुरा- २६

लकडगंज - २०

आशीनगर - १३

मंगळवारी - ३२

झोननिहाय मंडळांचे परवानगीसाठी प्राप्त अर्ज व दिलेली परवानगी

झोन प्राप्त अर्ज व दिलेली परवानगी

लक्ष्मीनगर - ४५ - ४५

धरमपेठ - ५६ - ५६

हनुमाननगर - ४६ - ४६

धंतोली - १३ - १३

नेहरूनगर - ३० - ३०

गांधीबाग - ८३ - अप्राप्त

सतरंजीपुरा - ३८ - अप्राप्त

लकडगंज - २९ - २९

आशीनगर - १३ - अप्राप्त

मंगळवारी - ७० - ७०

एकूण - ४२३ - २८९

झोननिहाय कृत्रिम तलावाची व्यवस्था

लक्ष्मीनगर - अजनी चौक राजीव गांधी पुतळ्याजवळ, धंतोली बगीचा, व्हॉलिबॉल मैदान पूर्व लक्ष्मीनगर, उज्ज्वल नगर दुर्गा मैदान, छत्रपतीनगर, हनुमान मंदिर, सोनेगाव तलावाजवळ, एमआयजी त्रिमूर्तीनगर, एनआयटी कॉलनी, प्रतापनगर, स्केटिंग ग्राऊंड, ऑर्बिटल वसाहत एकात्मता नगर जयताळा, राजेंद्रनगर मैदान

धरमपेठ - धाबा हनुमान मंदिर, नीम पार्क फ्रेंड्स कॉलनी, अंबाझरी ओव्हर फ्लोर, फुटाळा तलाव ग्राऊंड, रामनगर नीट, माधवनगर, टिळकनगर ग्राऊंड, रवीनगर वसाहत, रामदासपेठ लेंड्रा पार्क, किरण नगर ग्राऊंड, विष्णू की रसोई, शिवाजीनगर सभागृह, चिल्ड्रन पार्क, यशवंत स्टेडियम.

हनुमाननगर - म्हाळगी नगर मनपा शाळा, नंदलाल साहू सांस्कृतिक सभागृहजवळ, नासरे सभागृहाच्या मागे, नरसाळा, संभाजीनगर पाण्याची टाकी, तुकडोजी चौक, राजीव गांधी पार्क, कांबळे यांच्या घराजवळ कबड्डी मैदान गणेशनगर, रेशीम बाग ,चंदननगर राममंदिर, सिद्धेश्वर सभागृह, मानेवाडा चौक, लाडीकर ले-आऊट, अयोध्यानगर साईमंदिर, गजानन शाळेजवळ, मानेवाडा चौक, अभयनगर, रिंग रोड लव-कुशनगर, हुडकेश्वर पोलीस स्टेशन रोड, उदयनगर चौक.

धंतोली - आग्याराम देवी चौक, बालभवन पार्क आतमध्ये, मॉडेल मिल चौक, गणपती मंदिर गांधीसागर तलावाच्या बाजूला, झुलेलाल मंदिराच्या आतमध्ये, गरम पाणी रोड झुंबरजवळ, अजनी पोलीस स्टेशन, मानवता शाळेजवळ, भगवाननगर, बालाजीनगर, रामकृष्ण सोसायटी समाजभवन, महाजन आटा चक्की, चिचभवन कॉपोर्रेशन शाळेजवळ

नेहरूनगर - दामोदर लॉन खरबी रोड, चैतन्येश्वर रोड नागोबा मंदिर, मनपा शाळा वाठोडा, संघर्षनगर शीतला माता मंदिर, वुमन्स कॉलेज, गुरुदेव नगर बगीचा, सद्भावनानगर, शंकर मूर्ती नंदनवन, किशोर कुमेरिया यांच्या ऑफिसजवळ, रेखा साकोरे यांच्या ऑफिसजवळ, सहकारनगर, योगेश्वरनगर, कीर्ती नगर महाकाळकर कॉम्प्लेक्स, सक्करदरा लेक गार्डन, सक्करदरा तलावाजवळ, बॉलिवूड सेंटर पॉईंट, महाकाळकर सभागृह, आशीर्वाद नगर.

गांधीबाग - काशीबाई देऊळ संत गुलाबबाबा, हेडगेवार यांच्या घराजवळ, शिवाजी पुतळा गडकरी वाड्यासमोर, भोसले विहार कॉलनी, टिळक पुतळ्याजवळ, चिटणवीसपुरा शाळेजवळ, चिटणीस पार्कजवळ, गांधीबाग उद्यानाजवळ, गंगोत्री बार हॉटेलजवळ, लाल शाळेजवळ गीतांजली, मारवाडी चाल, गांधीबाग भावसार चौक, इतवारी होलसेल मार्केट, चंद्रहास बिअर बार जवळ लाकडी पुलाजवळ, हनुमान चौक.

सतरंजीपुरा झोन - मंगळवारी तलाव परिसर, नाईक तलाव परिसर

लकडगंज - तुकारामनगर हनुमान मंदिर नगर चौक गोतमारे यांच्या घराजवळ कळमना, तलमले ले-आऊट, नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेमागे, प्रजापतीनगर, सरदार पटेल ग्राऊंड, फुले समाजभवन हिवरीनगर, शिवमंदिर हिवरीनगर, व्यंकटेश कॉलनी, आरटीओ मैदान डिप्टी सिग्नल, सूर्यनगर हनुमान मंदिर, सुभाषनगर पवनसुत हनुमान मंदिर, अण्णा भाऊ साठे मैदान, मानकर वाडी, लाल शाळा पारडी.

आशीनगर - समतानगर नाल्याच्या पुलाजवळ, बारुद कंपनी मंदिरजवळ नांदेड सहयोगनगर, विनोबा भावेनगर, शिवाजी चौक यशोधरानगर शीतला माता मंदिर महेंद्रनगर, महर्षी दयानंद पार्क, बुद्ध पार्क, गुरू नानक पुरा बगीच्या जवळ.

मंगळवारी - सिंधूनगर सोसायटी जरीपटका,आंबेडकर पार्क अमरज्योतीनगर, नारा गाव, पोलीस लाईन टाकळी तलाव, राठी मैदान झिंगाबाई टाकळी, गोरेवाडा तलाव.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर