शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

नागपुरात गॅस्ट्रोचे ३९६, उष्माघाताचे १९२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 20:28 IST

शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. यातच दूषित पाण्यामुळे होणारे आजार वाढले आहेत. गेल्या महिन्यात गॅस्ट्रोचा ३९६ रुग्णांची नोंद झाली आहे. पाणी समस्येसोबतच वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या उष्माघाताचे रुग्णही वाढले आहेत. एप्रिल महिन्यात १९२ रुग्ण आढळून आले आहेत. तूर्तास या आजाराच्या एकाही मृत्यूची नोंद नाही.

ठळक मुद्दे मृत्यूची नोंद नाही : आरोग्य विभागाचे खबरदारीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. यातच दूषित पाण्यामुळे होणारे आजार वाढले आहेत. गेल्या महिन्यात गॅस्ट्रोचा ३९६ रुग्णांची नोंद झाली आहे. पाणी समस्येसोबतच वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या उष्माघाताचे रुग्णही वाढले आहेत. एप्रिल महिन्यात १९२ रुग्ण आढळून आले आहेत. तूर्तास या आजाराच्या एकाही मृत्यूची नोंद नाही.दूषित अन्न व पाण्यामुळे होणारा गॅस्ट्रो हा उन्हाळ्यात व पावसाळ्यात सर्वात जास्त आढळून येतो. या आजाराच्या उपचारासाठी महानगरपालिकेचा आरोग्य विभागाचे आयसोलेशन हॉस्पिटल सज्ज आहे. येथील बाह्यरुग्ण विभागात रोज ८० ते ९० रुग्ण उपचारासाठी येतात. एप्रिल महिन्यात या हॉस्पिटलमध्ये ३९६ रुग्णांना भरती करून उपचार करण्यात आले. साधारण एक किंवा दोन दिवस ठेवून रुग्णालयातून त्यांना सुटी देण्यात आली. मे आणि जून महिन्यापर्यंत या आजराच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या रुग्णांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे.उष्माघात वाढतोयगेल्या काही दिवसांत शहराच्या तापमानात घट आली असतानाही उष्माघाताचा रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. एप्रिल महिन्यात १९२ रुग्णांची नोंद झाली आहे. महानगरपालिकेच्यावतीने या आजराला घेऊन मनपाच्या इस्पितळात आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. दुपारी १२ ते ३ या वेळात कष्टाची कामे न करण्याचा सल्लाही दिला आहे.झाव काढू नकाउन लागले म्हणून आजही अनेक घरांमध्ये थंड पाण्यात फडा (झाडू) भिजवून उघड्या अंगावर ते शिंपडतात व नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे आजार कमी होण्यापेक्षा तो वाढतो. उन लागू नये म्हणून भरपूर पाणी पिऊनच घरून निघा. उन्हापासून वाचण्याकरीता कान, नाक, डोके झाकले जाईल असे कापड बांधा. सैल सूती पांढऱ्या कपड्याचा वापर करा. खिशात पांढरा कांदा ठेवा. उन्ह लागल्यासारखी लक्षणे दिसल्यास पांढऱ्या कांदाचा रस काढून चार थेंब नाकात टाका. कांद्याचा रस तळपायाला चोळा. शरीर थंड करण्यासाठी बत्तासे किंवा खडीसाखर पाण्यात घोळून ते प्या.डॉ. गणेश मुकावारअधिष्ठाता, आयुर्वेद रुग्णालय

टॅग्स :Sun strokeउष्माघातHealthआरोग्य