शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

नागपूर @ ३.५ : थंडीने तोडला ८१ वर्षांचा रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 20:37 IST

थंडीने नागपुरात ८१ वर्षातील सर्व रेकॉर्ड तोडत नागपूरकरांना गारठून सोडले आहे. शनिवारी सकाळी पारा तब्बल ३.५ अंशांपर्यंत खाली घसरला व नागपूरच्या शतकीय इतिहासात थंडीचा एक नवा रेकॉर्ड नोंदविल्या गेला. पारा सामान्यापेक्षा ९ अंशांनी खाली घसल्यामुळे अतिशीतलहर सारखी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसर्वत्र थंडीची लाट :नागपूरकर गारठले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थंडीने नागपुरात ८१ वर्षातील सर्व रेकॉर्ड तोडत नागपूरकरांना गारठून सोडले आहे. शनिवारी सकाळी पारा तब्बल ३.५ अंशांपर्यंत खाली घसरला व नागपूरच्या शतकीय इतिहासात थंडीचा एक नवा रेकॉर्ड नोंदविल्या गेला. पारा सामान्यापेक्षा ९ अंशांनी खाली घसल्यामुळे अतिशीतलहर सारखी स्थिती निर्माण झाली आहे.नागपुरात ७ जानेवारी १९३७ रोजी ३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. ते आजवरचे सर्वात कमी तापमान होते. यानंतर २९ डिसेंबर २०१४ रोजी पारा ५ अंशांपर्यंत घसरला होता. मात्र, शनिवारी थंडीने सर्व रेकॉर्ड तोडले. आजवरच्या इंतिहासात सर्वात थंड दिवस अशी नोंद झाली. नागपुरात गेल्या ४८ तासात तापमानात झपाट्याने घट झाली. वाढत्या थंडीमुळे नागरिकांसह पशुपक्ष्यांना त्रास सुरू झाला आहे.नागपुरात डिसेंबर व जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडते. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पारा सामान्य स्तरावर राहिला. दुसऱ्या पंधरवड्यात मात्र हवामानात बदल होऊन कडाक्याची थंडी सुरू झाली. २२ डिसेंबर २०१८ रोजी नागपूर तापमान ६.३ अंशांपर्यंत खाली आले होते. नंतर पारा हळू हळू वर सरकला व १०.९ अंशांपर्यंत पोहोचला. उत्तर भारतातून अचानक आलेल्या थंड वाºयांमुळे वातावरण बदलले. २८ डिसेंबर रोजी पुन्हा तापमान घटून ५.७ अंश झाले. शीतलहर येथेच थांबली नाही तर २४ तासात यात पुन्हा २.२ अंशांची घट झाली व पारा ३.५ अंशांवर पोहोचला.शेजारी राज्यांमध्येही थंडीचा कडाकाशेजारील राज्य मध्यप्रदेशमध्ये देखील थंडीचा कडाका कायम आहे. पचमढी येथे १, बैतुल १, खजुराहो १.४, उमरिया १.७, उज्जैन २.५, दतिया २.६, दमोह ३ व नौगांव मध्ये ३.१ अंशांपर्यंत तापमान खाली आले आहे. छत्तीसगडमध्येही शीतलहर सुरू आहे.उत्तरेतील थंड वाऱ्याचा परिणामउत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू आहे. जम्मू-काश्मिरात बऱ्याच ठिकाणी तापमान शून्य अंशाखाली गेले आहे. राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्येही हीच स्थिती आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मध्यभारताला गारठून सोडले आहे.४८ तासात पारा ७.४ अंश घसरलादिनांक     तापमान२७ डिसेंबर १०.९२८ डिसेंबर ५.७२९ डिसेंबर ३.५सर्वाधिक किमान तापमानदिनांक                   तापमान२९ डिसेंबर २०१८     ३.५ ७ जानेवारी १९३७    ३.९ २९ जिडसेंबर २०१४   ५.०२८ डिसेंबर १९८३     ५.७ २८ डिसेंबर २०१८    ५.७विदर्भात शीतलहरजिल्हा     तापमाननागपूर     ३.५अकोला   ५.९गोंदिया    ६.०ब्रह्मपुरी   ७.०बुलडाणा ७.८वर्धा        ८.४वाशिम   ८.६यवतमाळ ९.०चंदपूर     ९.०अमरावती ९.६गडचिरोली १०.२

 

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर