शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

नागपुरात महिनाभरात कोरोनाचे १५,५१४ रुग्ण, १७७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 7:00 AM

Nagpur news रविवारी नागपुरात ८९९ रुग्ण पॉझिटिव्ह तर, ५ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या १,४९,७८८ तर मृतांची संख्या ४१,३३५ झाली आहे.

ठळक मुद्दे८९९ नवे रुग्ण, ५ मृत्यू तीन महिन्यानंतर रुग्णात वाढ, मात्र मृत्यूसंख्येत घट

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद सप्टेंबर महिन्यात झाली. या महिन्यात ४८,४५७ रुग्ण आढळून आले. त्यानंतर ही संख्या कमी होत गेली. परंतु डिसेंबरपासून पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. या महिन्यात १२,००२ रुग्णांची नोंद झाली तर, फेब्रुवारीमध्ये १५,५१४ नव्या रुग्णांची भर पडली. तीन महिन्यानंतर रुग्णात वाढ झाली असली तरी, मृत्यूसंख्येत घट दिसून येत आहे. रविवारी ८९९ रुग्ण पॉझिटिव्ह तर, ५ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या १,४९,७८८ तर मृतांची संख्या ४१,३३५ झाली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाला ११ मार्च रोजी एक वर्षाचा कालावधी होत आहे. या महिन्यात १६ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर ही संख्या वाढत गेली. एप्रिलमध्ये १२२, मेमध्ये ४०३, जूनमध्ये ९६४, जुलैमध्ये ३,८८७, ऑगस्टमध्ये २४,१६३, सप्टेंबरमध्ये ४८,४५७, ऑक्टोबरमध्ये २४,७७४, नोव्हेंबरमध्ये ८,९७९, डिसेंबरमध्ये १२,००२, जानेवारीमध्ये १०,५०७ तर फेब्रुवारीमध्ये १५,५१४ रुग्णांची नोंद झाली. दरम्यानच्या काळात कमी झालेली रुग्णसंख्या वाढताना दिसून येत असली तरी, सप्टेंबर महिन्यानंतर मृत्यूच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्यात १४०६, ऑक्टोबरमध्ये ९५२, नोव्हेंबरमध्ये २६९, डिसेंबरमध्ये २५८, जानेवारीमध्ये २२० तर फेब्रुवारीमध्ये १७७ मृत्यूची नोंद झाली. मागील महिन्यात कोरोना चाचण्यांचा विक्रम झाला. १३,०२७ या सर्वाधिक चाचण्यांची नोंद २७ फेब्रुवारी रोजी झाली.

- शहरात ७२२ तर ग्रामीणमध्ये १७४ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात शनिवारच्या तुलनेत आज चाचण्यांची संख्या कमी झाली. ११,५४२ चाचण्या झाल्या. यातून शहरातील ७२२, ग्रामीणमध्ये १७४ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ग्रामीणमध्ये आज शून्य मृत्यूची नोंद झाली. शहरात व जिल्हाबाहेर प्रत्येकी रुग्णांचा ३ मृत्यू झाला.

- १०,१२८ रुग्ण झाले बरे

फेब्रुवारी महिन्यात १०,१२८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १,३७,२०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे, ३१ जानेवारी रोजी बरे होण्याचा दर ९४.४२ टक्के होता. परंतु फेब्रुवारी महिन्यात रुग्णांची संख्या वाढल्याने व त्यातुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने दर ९१.६० टक्क्यावर आला आहे. आज ५७५ रुग्ण बरे झाले आहेत.

- अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली

३१ जानेवारी रोजी कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३,३३५ होती. यातील ९४४ रुग्ण विविध रुग्णालयात तर २,३९१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते. २८ फेब्रुवारी रोजी ही संख्या वाढून ८,२५३ झाली आहे. यातील २,३६२ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये तर ५,८९१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर कामाचा ताण वाढला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस