शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नागपुरात १४ हजार मद्यपी चालकांची उतरवली झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 22:20 IST

दारू प्यायल्यामुळे रस्त्यावरील अपघात वाढतात. क्षुल्लक कारणाचे पर्यवसान दंगलीत होते. यावर आळा घालण्यासाठी शहरात विविध मार्गावर ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. दोषी वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात दाखल होते, असे असतानाही ही प्रकरणे कमी होताना दिसून येत नाही. गेल्या वर्षी २७ हजार प्रकरणांची नोंद झाली. तर यावर्षी जानेवारी ते आॅगस्ट या महिन्यात १४ हजार १७ मद्यपी चालकांवर कारवाई करीत त्यांची झिंग उतरवली.

ठळक मुद्देआठ महिन्यातील कारवाई : गेल्या वर्षी ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’मध्ये २७ हजार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दारू प्यायल्यामुळे रस्त्यावरील अपघात वाढतात. क्षुल्लक कारणाचे पर्यवसान दंगलीत होते. यावर आळा घालण्यासाठी शहरात विविध मार्गावर ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. दोषी वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात दाखल होते, असे असतानाही ही प्रकरणे कमी होताना दिसून येत नाही. गेल्या वर्षी २७ हजार प्रकरणांची नोंद झाली. तर यावर्षी जानेवारी ते आॅगस्ट या महिन्यात १४ हजार १७ मद्यपी चालकांवर कारवाई करीत त्यांची झिंग उतरवली.वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यात मद्यपी चालकांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढतच चालले आहे. याला आळा बसावा यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर बॅरिकेट्स लावून ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची विशेष मोहीम राबवली जाते. विशेषत: ही मोहीम सायंकाळी ७ वाजतानंतरच सुरू होते. पोलीस उपायुक्त (वाहतूक) राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेत एकट्या आॅगस्ट महिन्यात १२०३ दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु या वर्षातील ही सर्वात कमी कारवाई असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते.

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढतेयचालकांच्यामुळे होणारे अपघात हे टाळता येऊ शकणारे आहेत. परंतु मद्यपान करून वाहन चालविणे हा गुन्हा आहे, हे माहीत असतानाही वाहनचालक या नियमाची पायमल्ली करताना दिसून येतात. वाहतूक विभागाच्या ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्रॉईव्ह’ या मोहिमेत जानेवारी महिन्यात १७११, फेब्रुवारीमध्ये २२१९, मार्चमध्ये १६२८, एप्रिलमध्ये १६८६, मेमध्ये १३५२, जूनमध्ये १८३७, जुलैमध्ये २३८१ तर आॅगस्ट १२०३ वाहनांवर झालेली कारवाई हे बोलके उदाहरण आहे.या चौकांमध्ये सर्वाधिक कारवाईशहरात बहुसंख्य मार्गावर ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई होते. गेल्या काही आठवड्यांपासून महाराजबाग रोडवर या कारवाईला व्यापक स्वरूप देण्यात आले. रोजचा मार्ग असलेल्या वाहन चालकांसाठी ही कारवाई डोकेदुखी ठरली होती. परंतु आता पोलीस आणि अशा वाहनचालकांची ओळख पटल्याने पोलिसांचा समजूतदारपणा दिसून येत आहे. शहरात या मार्गासोबतच तुकडोजी पुतळा, टीबी वॉर्ड,भांडे प्लॉट चौक, कमाल टॉकीज चौक, राणी दुर्गावतीनगर चौक, जरीपटका चौक, गिट्टीखदान चौक, प्रतापनगर चौक, टाकळी सीम, भगवानगर रोडवर नेहमी कारवाई होताना दिसून येते.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसalcohol prohibition actदारुबंदी कायदा