शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

CoronaVirus in Nagpur : नागपुरात दुसऱ्या दिवशीही १२७० पॉझिटिव्ह, ४५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:23 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. सलग तिसऱ्या दिवशी रोजच्या रुग्णसंख्येत हजार रुग्णांनी वाढ झाली आहे. आश्चर्यकारक म्हणजे, बुधवारी जेवढ्या रुग्ण व मृत्यूची भर पडली तेवढ्याच रुग्ण व मृत्यूच्या संख्येची गुरुवारी नोंद झाली. आज १२७० रुग्ण पॉझिटिव्ह तर ४५ रुग्णांचा जीव गेला.

ठळक मुद्देशहरात १००४ तर ग्रामीणमध्ये २६४ बाधितांची नोंद

लोकमत न्यूज नेटवकनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. सलग तिसऱ्या दिवशी रोजच्या रुग्णसंख्येत हजार रुग्णांनी वाढ झाली आहे. आश्चर्यकारक म्हणजे, बुधवारी जेवढ्या रुग्ण व मृत्यूची भर पडली तेवढ्याच रुग्ण व मृत्यूच्या संख्येची गुरुवारी नोंद झाली. आज १२७० रुग्ण पॉझिटिव्ह तर ४५ रुग्णांचा जीव गेला. नागपूर जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या २४,७६५ झाली असून, मृतांची संख्या ९०४ वर पोहचली आहे. रुग्णसंख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही हजारावर जात आहे. याचे प्रमाण रुग्णसंख्येचा तुलनेत ५९ टक्केआहे.कोरोनाच्या पाच महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात भयावह आकडेवारी समोर आली आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत आकडेवारी कमी कमी होत जाईल, असा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज होता. परंतु शेवटच्या आठवड्यातच रुग्णसंख्येत नवे विक्रम स्थापित होत असल्याचे दिसून येत आहे. यात मृत्यूच्या आकड्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडविली आहे. इंदिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) आज नऊ रुग्णांचा मृत्यू झाला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (मेडिकल) १४ रुग्णांचे बळी गेले. यात विठ्ठलनगर हुडकेश्वर येथील ५४ वर्षीय पुरुष, चंद्रपूर येथील ३४ वर्षीय महिला, हिवरीनगर येथील ७५ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय युवती, ६९ वर्षीय महिला, अंबानगर मानेवाडा येथील ६० वर्षीय पुरुष, गरोबा मैदान येथील ७७ वर्षीय महिला, इमामवाडा येथील एक रुग्ण, नारी रोड येथील ७५ वर्षीय रुग्ण, लालगंज मेहंदीबाग येथील ४५ वर्षीय पुरुष, विश्रामनगर छत्रपती चौक येथील ७५ वर्षीय महिला, २७ वर्षीय तरुण, ४० वर्षीय पुरुष व भंडारा येथील ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. उर्वरित मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.४,४१४ अ‍ॅन्टिजन चाचणीतून ५३७ पॉझिटिव्हग्रामीण भागात १६२५ तर शहरात २,७८९ असे एकूण ४,४१४रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्या झाल्या. यात ५३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एकूण चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १२.१६ टक्के होते. याशिवाय ग्रामीण भागातील ३२९ तर शहरातील २,१५२ अशा एकूण २,४८१ रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. यात ७३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एम्समधून ५५, मेडिकलमधून ११८, मेयोमधून १३३, नीरीमधून ९४ तर खासगी लॅबमधून ३३३ रुग्णांची नोंद झाली.शहरातील १८,९६८ तर ग्रामीणमधील ५,५२५ रुग्ण बाधितआज शहरात १००४, ग्रामीणमध्ये २६४ तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांची नोंद झाली. शहरात रुग्णांची एकूण संख्या १८,९६८, ग्रामीणमध्ये ५,५२५ तर जिल्ह्याबाहेरील २७२ आहेत. दिवसभरात शहरात ३३, ग्रामीणमध्ये १० तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णाचा मृत्यू झाला. एकूण मृतांमध्ये शहरात ६८१, ग्रामीणमध्ये १३३ तर जिल्ह्याबाहेरील ९० मृत्यू आहेत. आज १०५४ रुग्ण बरे झाले. यात शहरातील ८३४ तर ग्रामीणमधील २२० रुग्ण आहेत. आतापर्यंत शहरातील १०,५८६ तर ग्रामीण भागातील ४,१७७ असे एकूण १४,७६३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरातील ७,०३६ तर ग्रामीणमधील २,०६२ असे एकूण ९,०९८ रुग्ण उपचार घेत आहेत.दैनिक संशयित : ६,८९५बाधित रुग्ण : २४,७६५बरे झालेले : १४,७६३उपचार घेत असलेले रुग्ण : ९,०९८मृत्यू : ९०४शहर व ग्रामीणमध्ये कोरोनाची स्थितीआजचे रुग्ण शहरात १००४ग्रामीणमध्ये २६४एकूण रुग्ण शहरात १८,९६८ग्रामीणमध्ये ५,५२५आज मृत्यू शहरात ३३ग्रामीणमध्ये १०एकूण मृत्यू शहरात ६८१ग्रामीणमध्ये १३३आज बरे झालेले रुग्ण शहरातील ८३४ग्रामीणमधील २२०एकूण बरे झालेले रुग्ण शहरात १०,५८६ग्रामीणमधील ४,१७७अयोध्यानगर पोस्ट ऑफीसमध्ये ११ पॉझिटिव्हअयोध्यानगर पोस्ट ऑफिसमधील ११ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गुरुवारी १० कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर एका कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट बुधवारीच आला होता. पोस्ट ऑफिस एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहे.अयोध्यानगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये एकूण २५ कर्मचारी कार्यरत आहेत. शुक्रवारी पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. २८ ऑगस्टनंतर पोस्ट ऑफिस उघडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यापूर्वी सुद्धा जीपीओमधील चार कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर