शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Nagpur: नागपूर विभागात तब्बल ५६ विषयांचा शंभर टक्के निकाल  

By योगेश पांडे | Updated: May 21, 2024 23:37 IST

Nagpur HSC Result: मंगळवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये नागपूर विभागात यंदा तब्बल ५६ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण विषयांच्या तुलनेत ही टक्केवारी ४३.०७ टक्के इतकी आहे. मागील वर्षी हाच आकडा ४५ (३५.१५ टक्के) इतका होता.

- योगेश पांडे

नागपूर  -  मंगळवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये नागपूर विभागात यंदा तब्बल ५६ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण विषयांच्या तुलनेत ही टक्केवारी ४३.०७ टक्के इतकी आहे. मागील वर्षी हाच आकडा ४५ (३५.१५ टक्के) इतका होता. याशिवाय विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदा फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी या विषयांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. तसेच व्होकेशनल अभ्यासक्रमांशी संबंधित विषयांचे निकालदेखील चांगले लागले आहेत.

यंदा बारावीला एकूण १३० विषय होते. त्यातील ५६ विषयांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. तर, ३० विषयांचे निकाल ९९ टक्के किंवा त्याहून अधिक लागले आहेत.

बारावीत गणित व इंग्रजीची विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती वाटत असते. कोरोनाच्या अगोदरपर्यंत गणिताचा निकाल ९० टक्क्यांच्या जवळपास राहायचा. मागील वर्षी गणिताचा निकाल ९६.७४ टक्के होता. यावर्षी त्यात किंचित वाढ झाली असून, आकडा ९६.८६ टक्क्यांवर गेला आहे. फिजिक्स (९८.८६%), बायोलॉजी (९९.४१%) व केमेस्ट्री (९९.३० %) या विषयांचा निकालदेखील मागील वर्षीपेक्षा काहीसा वाढला आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यामुळे चांगलीच मदत झाली आहे. मराठीचा निकाल ९५.२९ टक्के, तर हिंदीचा निकाल ९७.२७४४ टक्के लागला आहे. संस्कृतमध्ये ९९.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

इंग्रजीला सर्वाधिक तर तीन विषयांना १० च्या आत परीक्षार्थी

यंदा १३० पैकी इंग्रजी विषयाला सर्वाधिक परीक्षार्थी होते. विभागात इंग्रजीला १ लाख ६० हजार २२८ परीक्षार्थी होते. मागील वर्षीपेक्षा हा आकडा जवळपास सात हजारांनी वाढला. तर, १ लाख २ हजार ९१६ विद्यार्थी मराठीच्या परीक्षेला बसले होते. तीन विषयांना १० हून कमी परीक्षार्थी बसले होते. यात फ्रेंच (८), जर्मन (३) व जापानीज (८) यांचा समावेश होता. ३१ विषयांमध्ये ५० किंवा त्याहून कमी परीक्षार्थी होते.

मुख्य विषयांचे निकाल

विषय : टक्केवारी (२०२२) : टक्केवारी (२०२३) : टक्केवारी (२०२४)इंग्रजी : ९६.७९ : ९२.७० : ९३.२८

गणित : ९९.६० : ९६.७४ : ९६.८६फिजिक्स : ९९.६७ : ९८.१७ : ९८.८६

बायोलॉजी : ९९.७० : ९८.४७ : ९९.३०केमेस्ट्री : ९९.७० : ९८.४९ : ९९.४१

मराठी : ९७.९६ : ९३.३९ : ९५.२९हिंदी : ९९.१५ : ९७.४७ : ९७.४४

संस्कृत : १०० : ९९.६० : ९९.५३

शंभर टक्के निकाल लागलेले विषय

- फ्रेंच- जापानीज्

- जर्मन- जिऑलॉजी

- फिलॉसॉफी- ड्रॉइंग

- हिस्ट्री ऑफ आर्ट्स- व्होकेशनल क्लासिकल म्युझिक

- मॅथेमॅटिक्स- स्टॅटिस्टिक्स (कॉमर्स)- कृषी विज्ञान

- इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स- मेकॅनिलक मेन्टेनन्स

- जनरल सिव्हिल इंजिनीअरिंग- ऑफिस मॅनेजमेंट

- स्मॉल इंडस्ट्रीज ॲण्ड सेल्फ एम्प्लॉयमेन्ट- क्रॉप सायन्स

- हॉर्टिकल्चर- फ्रेश वॉटर फिश कल्चर

- इलेक्ट्रॉनिक्स फिल्ड टेक्नॉलॉजी- ब्युटी थेरपिस्ट

- स्पोर्ट्स फिटनेस ट्रेनर- ॲग्रीकल्चर मायक्रो इरिगेशन टेक्नॉलॉजी

- टुरिझम हॉस्पिटॅलिटी- आयटीआय-६

- मेकॅनिकल टेक्नॉलॉजी - १- मेकॅनिकल टेक्नॉलॉजी-२

- मेकॅनिकल टेक्नॉलॉजी-३- हॉर्टिकल्चर- १

- हॉर्टिकल्चर- २- ॲनिमल हस्बंडरी ॲण्ड डेअरी – १

- ॲनिमल हस्बंडरी ॲण्ड डेअरी – २- ॲनिमल हस्बंडरी ॲण्ड डेअरी – ३

- फिशरीज टेक्नॉलॉजी - १- फिशरीज टेक्नॉलॉजी – २

- फिशरीज टेक्नॉलॉजी – ३- मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी - १

- मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी – २- मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी - ३

- रेडिओलॉजी टेक्निशिअन-१- रेडिओलॉजी टेक्निशिअन-२

- रेडिओलॉजी टेक्निशिअन-३- चाइल्ड ओल्ड एज केअर-१

- चाइल्ड ओल्ड एज केअर-२- चाइल्ड ओल्ड एज केअर-३

- ऑप्थॅल्मिक टेक्निशिअन-१- ऑप्थॅल्मिक टेक्निशिअन-२

- ऑप्थॅल्मिक टेक्निशिअन-३- फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी-१

- फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी-२- फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी-३

- टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट-१- टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट-२

- टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट-३- मार्केटिंग ॲण्ड रिटेल मॅनेजमेन्ट – १

- मार्केटिंग ॲण्ड रिटेल मॅनेजमेन्ट – २- मार्केटिंग ॲण्ड रिटेल मॅनेजमेन्ट - ३

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालnagpurनागपूर