शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

नागपुरात  नागपंचमीनिमित्त मंदिरांमध्ये झाले पुजन व अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:35 IST

श्रावण सोमवार व नागपंचमी असल्यामुळे शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. शहरातील विविध शिवमंदिरात व नाग मंदिरात भाविकांनी पूजा व अभिषेक केला. महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात फुलांची सेज बनविण्यात आली होती. जागृतेश्वर मंदिरात कावडधारकांनी आणलेल्या पाण्यानी भगवान शिवाचा अभिषेक करण्यात आला. तेलंगखेडीच्या कल्याणेश्वर मंदिर व महालातील पाताळेश्वर मंदिरासोबतच दहन घाटावरील शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. महालातील चिटणीसपार्क येथील नागोबा मंदिरात सकाळी भाविकांची गर्दी झाली होती.

ठळक मुद्देश्रावण सोमवार व नागपंचमी असल्याने भाविकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रावण सोमवार व नागपंचमी असल्यामुळे शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. शहरातील विविध शिवमंदिरात व नाग मंदिरात भाविकांनी पूजा व अभिषेक केला. महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात फुलांची सेज बनविण्यात आली होती. जागृतेश्वर मंदिरात कावडधारकांनी आणलेल्या पाण्यानी भगवान शिवाचा अभिषेक करण्यात आला. तेलंगखेडीच्या कल्याणेश्वर मंदिर व महालातील पाताळेश्वर मंदिरासोबतच दहन घाटावरील शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. महालातील चिटणीसपार्क येथील नागोबा मंदिरात सकाळी भाविकांची गर्दी झाली होती. 

भाविकांनी दुधाने अभिषेक केला. प्रसादाचे वितरण करण्यात आले. भजन आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. इतवारीच्या पोहाओळ, जुनी मंगळवारीतील चेतेश्वर मंदिर, केतेश्वर मंदिर, पाचपावलीचे पाताळेश्वर मंदिर, नायकवाडीच्या नाग मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.नागमंदिर जरीपटका 
जरीपटका येथील संत चांदूराम दरबार मार्गावरील नागमंदिरात नागपंचमी साजरी करण्यात आली. अशोक हेमराजानी व राजू सावलानी यांनी नागदेवतेचे पूजन केले. फुलांची सेज सजविण्यात आली होती. अखंड ज्योत पेटविण्यात आली होती. महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. काजू हरचंदानी, भूषण हरचंदानी, राजू सावलानी, ठाकुर जग्यासी, सुरेश जग्यासी, दिलीप सावलानी, अशोक सावलानी, राम सावलानी, दीपक सावलानी आदींचे सहकार्य लाभले.बजेरियामध्ये नागपंचमीनिमित्त मेळा 
बजेरियामध्ये अनेक वर्षापासून नागपंचमीनिमित्त मेळा भरतो. मोठ्या संख्येने भाविक या मेळाव्यात सहभागी होता. नागपूर शहर पोलीस मित्र समितीतर्फे आयोजित या मेळ्याचे उद्घाटन नगरसेवक जयप्रकाश गुप्ता यांच्याहस्ते करण्यात आले. त्याचबरोबर भगवान शिव व नागदेवतेचेही पूजन झाले. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, महेश चव्हाण, सुनील गांगुर्डे, दीपक पटेल, जुल्फेकार अहमद भुट्टो, महेश श्रीवास, संजय बालपांडे, एस. एस. गडेकर आदी उपस्थित होते. त्याचबरोबर समितीचे ममता वाजपेयी, शिवपाल शर्मा, हरीश कुंडले, शंकर जयपूरकर, कृष्णा गौर, किशोर तिवारी, शैलेंद्र साहू, नर्मदा राजोरिया, मीना बसाक, बबलू मिश्रा आदी उपस्थित होते.शिवशक्ती मंदिरजरीपटका येथील जनता हॉस्पिटलजवळ शिवशक्ती मंदिरात नागपंचमी साजरी करण्यात आली. संजय गोधानी यांच्या उपस्थितीत सकाळी महादेव नागदेवतांचे पूजन करण्यात आले. पं. सुनील शर्मा व मुरली महाराज यांच्या उपस्थितीत पूजा झाली. महाआरती करून प्रसादाचे वितरण करण्यात आले. सुरेश जग्यासी, सुरेश गोधानी, सोनी जानयानी, भागचंद जारानी, चिराग गोदानी, दिवान कुकरेजा, अनिल कुकरेजा, निखिल केसवानी, राजेश कुकरेजा आदी उपस्थित होते.राजराजेश्वरी शिवनाग मंदिरशांतिनगर कॉलनी येथील राजराजेश्वरी शिवनाग मंदिरात नागपंचमी साजरी करण्यात आली. नागदेवतेचे पूजन व अभिषेक करण्यात आला. पूजा पं. अरुण झा यांच्याद्वारे करण्यात आली. महाआरतीनंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी निरंजन शेंडे, रघुनाथ शेंडे, गणेश कांबळे, रमेश वर्मा, रमेश कांबळे, सुनील शर्मा, हरी जनवारे, अनिल चुटेलकर, चैतन्य शेंडे, निखिल शेंडे, सुजीत झा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nag PanchamiनागपंचमीReligious programmeधार्मिक कार्यक्रम