शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

विदर्भाचे आराध्य दैवत नागद्वार स्वामी; अमरनाथपेक्षाही कठीण का मानली जाते 'ही' यात्रा, जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 16:59 IST

Nagdwar Pachmarhi Mahadev yatra : यात्रा नागद्वारची ! जेथे खडतर डोंगर रस्ता पार करत भाविक पोहोचतात आपलं मागणं मागायला

सुरभी शिरपूरकर

नागपूर : विदर्भाचे आराध्य दैवत असलेले नागद्वार स्वामी यांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. अमरनाथ यात्रे प्रमाणेच अतिशय कठीण मानली जाणारी नागद्वार यात्रेचे द्वार दोन वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा भाविकांसाठी उघडण्यात आले आहे.

कैलाश पर्वत नंतर पचमढीला महादेवाचे दुसरे घर मानलं जातं. सातपुडाची राणी मानल्या जाणाऱ्या पचमढीत एक असे देवस्थान आहे ज्याला नागलोकचा मार्ग किंवा नागद्वारच्या नावाने ओळखल्या जाते. एका बाजूला खडतर डोंगररस्ता तर बाजुला मोठी दरी, यामध्ये छोटासा रस्ता.. तो पार करत भाविक मोठ्या उत्साहाने नागदेवाचं दर्शन घ्यायला जातात. यावेळी हरिहर.. हरिहरच्या गजरात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो.

संत गोविंदराव शिरपूरकर यांच्या नावे सातपुडा पर्वत रांगेत गोविंद गिरी पहाड आहे. गोविंद गिरी पहाडावर मुख्य गुहेत शिवलिंग असून या शिवलिंगाला काजळ लावल्यास मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. गोविंदराव शिरपूरकर यांनी अनेक वर्ष येथे पूजा अर्चना केली. भाविकांना भोजनाची व्यवस्था केली. तर त्यांची ही परंपरा गोविंदरावंचे वंशज आणि ज्येष्ठ समाजसेवक यादवराव शिरपूरकर त्यांचे सहकारी व इतर काही मंडळ चालवीत आहेत. लाखो भाविकांसाठी भंडारा व इतर व्यवस्थेची परंपरा ते चालवतात.  

तर छिंदवाडा आणि पिपरिया मध्ये वसलेली आदिवासी कोरकू समाजाची मंडळी या यात्रेत विशेष भूमिका पार पाडतात. हा समुदाय लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंतचया लोकांना आपल्या खांद्यावर बसवून पहाड चढतात. या अतिशय कठीण यात्रेत खिशात एक मोबाईल ठेवून सुद्धा ओझं वाटतं पण या यात्रेत ही कोरकू मंडळी आपल्या डोक्यावर गॅस सिलेंडरपासून ते जनरेटर व इतर अनेक भंडाऱ्याचे सामान ठेवून पहाड चढतात.

नागमोडी वळणातून नागद्वारची कठीण यात्रा पूर्ण केल्यास कालसर्प दोष दूर होतो अशी ही भाविकांची श्रद्धा आहे, त्यामुळे श्रावणात रिमझिम पावसाचे यात्रेला भाविक मोठ्या संख्येत भक्तीभावाने सहभागी होतात.

सातपुडा पर्वत रांगेत सात पहडांना पार करून तुम्ही नागद्वारी पोहोचू शकता. अगदी पहाटेच भाविक नागदेवतेच्या दर्शनासाठी निघतात. नागद्वार मंदिराची गुफा जवळजवळ ३५ फिट लांब आहे. याशिवाय या यात्रेत विशेष करून कालाझाड (भाजीयागिरी) ते काजळी, पदमशेष प्रथम द्वार, पश्चिम द्वार (द्वितीय द्वार) चिंतामणी, चित्रशाळा माई, गुप्त गंगा, निशाण गढ, जलगली, गुप्तगंगा इत्यादी देवस्थानाचे दर्शन आणि जवळजवळ २५ ते ३० किलोमीटरची पैदल पहाडी यात्रा पूर्ण करायला जवळजवळ दोन ते ३  दिवसाचा कालावधी लागतो. अशी मान्यता आहे की अनके वर्षांपूर्वी यात्रेच्या वेळी पहाडाच्या संपूर्ण मार्गावर नागदेवतेचे दर्शन व्हायचे आणि भाविक यांना हाताने सरकवत पुढची वाटचाल पूर्ण करायचे. 

कढई आणि कसानीची प्रथा  

नागद्वार यात्रेनंतर कढई किंवा कसनी करणे ही आवश्यक असते आणि मनंतप्रमाणे भाविक ही परंपरा ही गेल्या शेकडो वर्षांपासून निभवतायत.  

सातपुडा हा फॉरेस्ट रिझर्व एरिया असल्याने नागद्वार स्वामीच्या दर्शनासाठी भाविकांना वर्षभर वाट पहावी लागते. गेली दोन वर्ष कोविडच्या संसर्गामुळे यात्रा बंद होती. परंतु, यावर्षी यात्रेला परवानगी मिळाली असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील भाविकांचे खास आकर्षण असलेली नागद्वार पचमढी यात्रेसाठी एसटीची विशेष बस सेवा ही सुरू झाली आहे.

यंदा नागद्वार यात्रा दहा दिवसांची असेल. तर पाच लाखाहून अधिक श्रद्धाळू दर्शनाला येतील असा अंदाज आहे. २३ जुलैपासून ते ३ ऑगस्ट पर्यंत यात्रेची अनुमती प्रशासनाने दिलेली आहे. तर नागपूरकरांनो.. हर भोला हर हर महादेवचा गजर करत तयार आहात ना नागद्वार यात्रेला..

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमVidarbhaविदर्भ