Nagar Panchayat Election Results 2022 : हिंगणा नगर पंचायतीत भाजपची सत्ता, कुहीत कॉंग्रेसची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 04:11 PM2022-01-19T16:11:00+5:302022-01-19T16:16:56+5:30

जिल्ह्यात हिंगणा आणि कुही या दोन नगर पंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया काल पार पडली. यात हिंगण्यात भाजपने विजय मिळवला असून कुहीत काँग्रेसने बाजी मारली आहे.

Nagar Panchayat Election Results 2022 : bjp victory in hingna and congress wins in kuhi | Nagar Panchayat Election Results 2022 : हिंगणा नगर पंचायतीत भाजपची सत्ता, कुहीत कॉंग्रेसची सरशी

Nagar Panchayat Election Results 2022 : हिंगणा नगर पंचायतीत भाजपची सत्ता, कुहीत कॉंग्रेसची सरशी

googlenewsNext
ठळक मुद्देहिंगण्यात राष्ट्रवादीचे बंग यांना धक्का तर भाजपाचे आ.मेघे यांचे वर्चस्व कायम कुहीत कॉंग्रेसच्या राजू पारवेंनी बाजी मारली; राष्ट्रवादीचाही ४ जागावर विजय 

नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का देत भाजपाने दमदार विजय मिळविला आहे. कुही नगरपंचायतीत कॉंग्रेसला एकहाती सत्ता मिळविता आली नसली तरी अपक्ष उमेदवाराच्या बळावर कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे.

बुधवारी हिंगणा आणि कुही नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. तीत १७ सदस्यीय हिंगणा नगरपंचायतीत भाजपाला ९, राष्ट्रवादी-५, शिवसेना-१ आणि दोन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला. 

२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादीला ११ तर भाजपाला ६ जागावर यश मिळाले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री रमेश बंग यांना धक्का देत आ.समीर मेघे यांनी बाजी मारली. येथे भाजपाच्या तीन जागा वाढल्या तर राष्ट्रवादीच्या ६ जागा कमी झाल्या आहेत. 

हिंगण्यात पश्चिम नागपूरचे आ.विकास ठाकरे, जि.प.सदस्या कुंदा राऊत, बाबा आष्टणकर यांच्या बळावर कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिला होता. मात्र तो यशस्वी हो‌वू शकला नाही. हिंगण्यात कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. 

कुही नगरपंचायतीच्या १७ पैकी ८ जागावर कॉंग्रेसने विजय मिळविला आहे. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी ४ जागा मिळाल्या तर एका वॉर्डात अपक्ष उमेदवार विजय झाला. येथे अपक्ष उमेदवाराच्या बळावर कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीचा दोन वॉर्डात निसटता पराभव झाला अन्यथा कुहीत सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादीकडे निश्चितच गेल्या असत्या. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे हा फटका बसला. 

कुहीत गतवेळी कॉंग्रेसचा ८, भाजपा-५, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष असे प्रत्येक एक नगरसेवक विजयी झाले होते. यावेळी कुही कॉंग्रेसचा ग्राफ वाढला नसला तरी त्यांनी गतवेळच्या जागा कायम राखल्या आहे. आ.राजू पारवे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीचा गड उमरेड विधानसभा क्षेत्राचे प्रभारी विलास झोडापे यांनी लढविला. यात राष्ट्रवादीला गतवेळपेक्षा तीन जागा अधिक जिंकता आल्या. 

अंतिम निवडणूक निकाल असे 

हिंगणा नगरपंचायत
एकूण जागा - १७
भाजपा - ९
राष्ट्रवादी कॉंग्रेस- ५
कॉंग्रेस- ००
शिवसेना - १
अपक्ष - २

कुही नगरपंचायत 
एकूण जागा - १७
कॉंग्रेस - ८
राष्ट्रवादी- ४
भाजपा - ४
शिवसेना - ००
अपक्ष- १

Web Title: Nagar Panchayat Election Results 2022 : bjp victory in hingna and congress wins in kuhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.