शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
3
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
4
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
5
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
6
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
7
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
8
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
10
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
11
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
12
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
13
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
14
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
15
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
16
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
17
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
18
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
19
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
20
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

नाग पुनरुज्जीवन परिक्रमा, सीताबर्डी ते जगनाडे चौक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

नदीत सोडले जाते सिवरेज; अतिक्रमण अन् बांधकामाचा विळखा लोकमत न्यूज नेटवर्क गणेश हूड/ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १८ ...

नदीत सोडले जाते सिवरेज; अतिक्रमण अन् बांधकामाचा विळखा

लोकमत न्यूज नेटवर्क

गणेश हूड/ लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : १८ व्या शतकात, नागपूरला जीवन देणाऱ्या या संजीवन नाग नदीचा पिण्याच्या पाण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी व धार्मिक कार्यांसाठी उपयोग होत होता. असाच स्वच्छ पाण्याचा प्रवाह पुन्हा वाहू लागेल अशी सर्वांचीच इच्छा आहे. शहरातल्या सीताबर्डी येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागे नाग नदीला एक ओढा येऊन मिळतो. या संगमावर इ.स. १७७९ मध्ये दुसऱ्या रघूजीची आई व मुधोजीची पत्नी चिमाबाई हिने महादेवाचे देऊळ बांधले. या संगमावर आंघोळीसाठी नागरिक यायचे. आज या संगमाचे गटार झले आहे. सर्व बाजूंनी अतिक्रमणाचा वेढा आहे. नाल्याचे घाण पाणी नदी पात्रात येत असल्याने ही नदी की गटार, असे चित्र ‘लोकमत’ने शुक्रवारी या नदीची पुनरुज्जीवन परिक्रमा केली तेव्हा दिसून आले.

या संगमावर दुसरे रघूजी आणि परिवार धार्मिक कार्यासाठी जात असत. भोसले राजे विजयादशमीला सकाळी घोडे, हत्तींना संगमावर आंघोळीसाठी आणत. हत्ती बुडू शकेल इतके खोल पाणी संगमावर होते. नदीच्या काठी शस्त्रपूजा आणि शमीची पूजा व्हायची. सायंकाळी भोसले परिवार सीमोल्लंघनासाठी नाग नदी ओलांडून राजाबक्षाच्या मारुतीला जायचा. नाग नदी पुनरुज्जीवनाने पुन्हा हे गतवैभव प्राप्त होईल, असे वाटून घेण्याचे कारण नाही. नदी किनाऱ्यावर व नदीपात्रातील अतिक्रमण यातून नदीची मुक्तता करणे तेवढे सोपे नाही. मागील तीन-चार दशकात नदी कशी गटार झाली, हे प्रशासन व लोकप्रतिनिधींना कळलेच नाही, असे नाही; पण उशिरा का होईना पुनरुजजीवन होत असेल तर ते सर्वांनाच हवे आहे. नाग नदी शुध्दीकरणात जागोजागी बाधा आहे. ती दूर केल्याशिवाय प्रकल्प पूर्णत्वास येणार नाही.

......

- नदीवर शहराच्या विविध भागातील ३५ हून अधिक पूल उभारण्यात आले आहेत. पूल पुन्हा बांधावे लागतील.

-नदी किनाऱ्यावरील ऐतिहासिक स्थळे आहेत. अशी धार्मिक स्थळे हटविताना तांत्रिक अडचणी आहेत.

-नदी पात्राला मिळणाऱ्या मोठ्या नाल्यांचे प्रवाह रोखावे लागतील.

....

संगम ते जगनाडे चौकदरम्यान जागोजागी अतिक्रमण

सीताबर्डी येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागे नाग नदीला एक ओढा येऊन मिळतो. या संगमावर महादेवाचे देऊळ आहे. पवित्र स्थळ म्हणून ओळख असली तरी आज येथे सर्वत्र घाण आहे. नदी व नाल्याच्या संरक्षण भिंतीवर लोकांनी बांधकाम केले आहे. यशवंत स्टेडियमच्या बाजूने फारशी जागा शिल्लक नाही. बाजूलाच नदी काठावर झोपडपट्टी आहे. पुढे पटवर्धन ग्राउंडच्या जागेत नदी लगत मेट्रोने बांधकाम केले आहे. मोक्षधामजवळ कॉटन मार्केटकडून येणारा नाला नदीला मिळतो. मोक्षधामचे बांधकाम करताना नदी पात्रात पिल्लर उभारून स्लॅब टाकण्यात आले आहे. यामुळे नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. लगतच नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाची उंची कमी आहे. थोडे पुढे गेल्यानंतर डालडा फॅक्ट्रीकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल असाच उभारला आहे. ग्रेट कॅनाल रोडने पुढे गेल्यानंतर मातंग वसाहतीत घरे नदी काठावर उभारली आहे. येथे नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या पिल्लरमुळे प्रवाहाला बाधा निर्माण झाली आहे. केळीबागकडे जाणाऱ्या मार्गावर नदीवर उभारण्यात आलेला पूल उंच नाही. तसेच बाजूलाच नदी काठावर मूकबधिर विद्यालय व लोकांची शाळा आहे. बैद्यनाथ चौकात नदी काठावर बहुमजली इमारत आहे. पुढे मूकबधिर विद्यालय, डीएड कॉलेज, होमिओपॅथी कॉलेज आहे. बाजूलाच गायत्री मंदिर आहे. नाग नदी पुरुज्जीवन प्रकल्पामुळे या परिसरातील नदी काठावरील लोकांचे पुनर्वसन करून संस्थांना पर्यायी जागा देण्याबाबतचा मुद्दा चर्चेला आला आहे.

........