शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नाग, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियान सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:31 IST

शहरातील नाग नदी, पिवळी नदी, तसेच पोरा नदीमधून पावसाचे पाणी थांबणार नाही तसेच पूर परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी नद्यांच्या स्वच्छता अभियानाला येत्या ७ मे पासून सुरुवात होत असून नद्यांच्या स्वच्छता अभियानामध्ये स्वयंसेवी संस्था व उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

ठळक मुद्देसंसद जल व पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत मोहीम : लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील नाग नदी, पिवळी नदी, तसेच पोरा नदीमधून पावसाचे पाणी थांबणार नाही तसेच पूर परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी नद्यांच्या स्वच्छता अभियानाला येत्या ७ मे पासून सुरुवात होत असून नद्यांच्या स्वच्छता अभियानामध्ये स्वयंसेवी संस्था व उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.बचतभवन येथे संसद जल व पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत नदी सफाई अभियानाची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीस आमदार प्रा. अनिल सोले, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र्र कुकरेजा, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त रवींद्र्र कुंभारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, मुख्य अभियंता मनोज तालेवार आदी उपस्थित होते.संसद जल व पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत शहरातील तीन प्रमुख नद्यांचे स्वच्छता अभियान मे व जून या महिन्यात राबविण्यात येत असून या अभियानासाठी विविध यंत्रणा, स्वयंसेवी संस्था तसेच उद्योजक व सीएसआर व निधीमधून या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. दरवर्षी अतिवृष्टी व पूरामुळे नद्यांचा प्रवाह बंद होत असल्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नद्यांची सफाई करण्यात येणार असून पावसाचे पाणी कुठेही थांबणार नाही या दृष्टीने नद्यामधील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी पोकलॅण्ड व जेसीपी सारख्या यंत्राची आवश्यकता आहे. यासाठी लोकसहभाग देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.नद्यांच्या सफाई व खोलीकरणाचे काम मागील वर्षीसुध्दा करण्यात आले आहे. यामध्ये नाग नदीची लांबी १८ किलोमीटीर, पिवळी नदी १७.५ कि.मी. तर पोरा नदीची लांबी १२ कि.मी. आहे. मागील वर्षी या नद्यांमधून १ लक्ष ३३ हजार मेट्रिक टन गाळ व कचरा ४५० टिप्पर काढण्यात आले. यासाठी १० पोकलॅण्डचा वापर करण्यात आला असून यासाठी ५० हजार लिटर डिझेलचा वापर झाला आहे. यावर्षी सुध्दा १५ पोकलॅण्डची आवश्यकता असून तिन्ही नद्यातील गाळ काढणे, तसेच खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे अभियान मागील चार वर्षापासून सातत्याने राबविण्यात येत आहे.

टॅग्स :Naag Riverनाग नदीnagpurनागपूर