शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिली वर्किंग ट्रान्सवूमन नर्स मायरा गुप्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 04:38 IST

शिक्षणाने घडवली क्रांती; हैदराबादमधील मोठ्या हॉस्पिटलमध्ये सांभाळतेय जबाबदारी

- वर्षा बाशू नागपूर : मायरा गुप्ता, भारतातील पहिली ट्रान्सवूमन वर्किंग स्टाफ नर्स. शिक्षणाने प्रगतीची महाद्वारे खुली होतात याचे अलीकडचे ताजे उदाहरण. ती सध्या हैदराबादमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आॅपरेशन थिएटरमधील तांत्रिक सहकर्मी म्हणून जबाबदारी सांभाळते आहे.मूळची नागपूरची असलेली मायरा गेल्या काही महिन्यांपूर्वी कायदेशीररीत्या मायरा आर. गुप्ता झाली आहे. त्याआधी ती विक्रम रामचंद्र गुप्ता होती. बहुतांश तृतीय पंथियांच्या वाट्याला येतात ते बरेवाईट, कडू अनुभव तिनेही पाहिले आहेत. पण मायराचा सेवाभावी स्वभाव आणि शिक्षणाची आवड यामुळे तिला एक वेगळी दिशा मिळाली. दुसरे म्हणजे तिची आई तिच्या पाठीशी भक्कमपणे उभी होती.बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर मानसशास्त्रात बी.ए. केले. मित्रमंडळीसाठी मदतीला धावणारी अन् आजारी लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहणारी मायरा साहजिकच वैद्यकीय क्षेत्राकडे वळली. आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून कामाला लागली. तिथे एक वर्षाचा आॅपरेशन थिएटर टेक्निकल असिस्टंट हा कोर्स केला. त्यानंतर तिने बंगळुरू येथून तीन वर्षांचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला आणि २०१८ मध्ये मायरा तेथीलच एका हॉस्पिटलमध्ये रुजू झाली. तिला अलीकडेच हैदराबाद येथील एका मोठ्या रुग्णालयात काम करण्याची संधी मिळाली आहे.नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या एक-दोन ट्रान्सवूमन्स देशात आहेत; पण त्या नोकरी करीत नाहीत, असे मायरा सांगते. या अर्थाने ती भारतामधील पहिली वर्किंग ट्रान्सवूमन नर्स झाली आहे. नर्स बनण्याचे मायराचे एक स्वप्न तर पूर्ण झाले. तिचे दुसरे स्वप्न एका समंजस जोडीदाराचे आहे.नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या एक-दोन ट्रान्सवूमन्स देशात आहेत; पण त्या नोकरी करीत नाहीत, असे मायरा सांगते. या अर्थाने ती भारतामधील पहिली वर्किंग ट्रान्सवूमन नर्स झाली आहे. तिने आपल्या कर्तृत्वाने इतरांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.नवा आदर्श रुढट्रान्सजेंडरचे आयुष्य म्हणजे केवळ टाळ्या वाजवणे, गाणी म्हणणे एवढेच मर्यादित राहिलेले नाही, नव्या जगाच्या नव्या वाटांवरून वाटचाल करायला पाहिजे. नर्स बनण्याचे मायराचे एक स्वप्न तर पूर्ण झाले. तिचे दुसरे स्वप्न एका समंजस जोडीदाराचे आहे. मात्र, तिने तद्दन, समाज व्यवस्थेचा तिटकारा झिडकारून नवा आदर्श रूढ केला आहे.