शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अपत्याला आईची जात नाकारली जाऊ शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:15 IST

राज्यघटनेने स्त्री व पुरुषाला समान दर्जा बहाल केला आहे. लिंगभेद करता येत नाही.

 - राकेश घानोडे नागपूर : राज्यघटनेने स्त्री व पुरुषाला समान दर्जा बहाल केला आहे. लिंगभेद करता येत नाही. परिणामी, आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याची अपत्ये स्वत:ला आईची जात लागू करण्याची मागणी करू शकतात. त्यांना आईची जात नाकारली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांनी दिला.नागपुरातील १९ वर्षीय वैद्यकीयची विद्यार्थिनी आंचल बडवाईक हिच्या वडिलांची जात महार (अनुसूचित जाती) तर, आईची जात तेली (इतर मागासवर्गीय) आहे. तिला आईची जात हवी आहे. त्यामुळे तिने जिल्हा जात पडताळणी समितीकडे दावा दाखल केला. समितीने तिची विनंती अमान्य केली होती. अपत्यांची जात वडिलांच्या जातीवरून ठरत असते. त्यामुळे वडील किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यात यावी, असे आंचलला सांगून तिचा दावा ६ जुलै २०१७ रोजी निकाली काढला होता. परिणामी, तिने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने तिची याचिका अंशत: मंजूर केली. आंचल पुरुषप्रधान समाजात राहत असली तरी, तिला आईची जात नाकारली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने सांगितले. तसेच, समितीचा वादग्रस्त आदेश अवैध ठरवून रद्द केला व आंचलच्या दाव्यावर तिच्या आईच्या बाजूची कागदपत्रे पडताळून सहा महिन्यामध्ये कायद्यानुसार सुधारित निर्णय घेण्याचा आदेश समितीला दिला. आंचलतर्फे अ‍ॅड. कीर्ती सातपुते यांनी कामकाज पाहिले.न्यायालयाचे निरीक्षणपितृसत्ताक ही एक सामाजिक व्यवस्था असून, ती देशाच्या मोठ्या भागात अस्तित्वात आहे. आपल्या समाजाने मातृसत्ताक व मातृवंशीय पद्धत स्वीकारलेली नाही, परंतु हा परिवर्तनाचा काळ आहे. भारतीयांनी राज्यघटनेमध्ये समानता, न्याय व बंधूभावाचा स्वीकार केला आहे. स्त्री व पुरुषांना समान दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या समानतेच्या व लिंगावरून भेदभाव नाकारणाºया काळात समाजातील प्राचीन विचारधारा मान्य केली जाऊ शकत नाही व यापुढे त्या विचारधारेवर वाटचालही केली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने या निर्णयात नोंदविले.