शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

‘माझी मेट्रो’, विकासाची ‘एक्सप्रेस’ ! नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 22:38 IST

‘ती’ कधी येणार व ‘तिला’ हिरवी झेंडी कधी दाखविणार याची प्रतिक्षा समस्त नागपुरकरांना लागली होती. अखेर गुरुवारी ‘ती’ मावळत्या दिनकराच्या साक्षीने धावली अन् २१ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झालेल्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा गुरुवारी गाठल्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून ‘माझी मेट्रो’चे लोकार्पण झाले अन् नागपुरच्या विकासाच्या ‘एक्सप्रेस’ची सुरुवात झाली. ‘माझी मेट्रो’चे काम केवळ कमी वेळेतच झालेले नाही, तर दर्जेदारदेखील झाले आहे. ‘माझी मेट्रो’मुळे नागपुरच्या विकासासोबतच पर्यटन तसेच रोजगार निर्मितीलादेखील चालना मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरी दळणवळणाची संकल्पना बदलेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देशहरी दळणवळणाची संकल्पना बदलणारसंत्रानगरी झाली ‘मेट्रो’नगरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ती’ कधी येणार व ‘तिला’ हिरवी झेंडी कधी दाखविणार याची प्रतिक्षा समस्त नागपुरकरांना लागली होती. अखेर गुरुवारी ‘ती’ मावळत्या दिनकराच्या साक्षीने धावली अन् २१ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झालेल्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा गुरुवारी गाठल्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून ‘माझी मेट्रो’चे लोकार्पण झाले अन् नागपुरच्या विकासाच्या ‘एक्सप्रेस’ची सुरुवात झाली. ‘माझी मेट्रो’चे काम केवळ कमी वेळेतच झालेले नाही, तर दर्जेदारदेखील झाले आहे. ‘माझी मेट्रो’मुळे नागपुरच्या विकासासोबतच पर्यटन तसेच रोजगार निर्मितीलादेखील चालना मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरी दळणवळणाची संकल्पना बदलेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.वर्धा रोडवरील ‘एअरपोर्ट साऊथ स्टेशन’वर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी नवी दिल्ली येथून ‘मेट्रो’ला हिरवी झेंडी दाखविली. यासोबतच खापरी ते सिताबर्डी यादरम्यानच्या १३.५ किमीच्या लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, केंद्रीय नगरविकास सचिव दुर्गाशंकर मिश्र, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते.‘माझी मेट्रो’ची निर्मितीमध्ये निधीचीदेखील बचत झाली आहे. देशातील इतर ‘मेट्रो’च्या तुलनेत नागपुरच्या ‘मेट्रो’चे काम दर्जेदार झाले आहे. येथे नाविन्यपूर्ण रचना आहे. तसेच ‘माझी मेट्रो’ सौरऊर्जा संपन्न असून सर्व स्थानकांची उभारणीदेखील आकर्षक पद्धतीने होत आहे. ‘मेट्रो’ची सर्व स्थानके ही मोक्याच्या ठिकाणी असून यासाठी अतिक्रमण हटविण्यात आले. शहरातील विविध बाजार परिसरांचा तसेच अन्य ठिकाणांचाही मेट्रोद्वारे विकास करण्यात येणार असल्याने शहराच्या विकासासाठी हे लाभदायकच ठरणार आहे. ‘ब्रॉडगेज मेट्रो’च्या रुपाने विस्तार करण्यात येणार असून ग्रामीण भागापर्यंत ‘मेट्रो’ यापुढील काळात पोहोचेल. इलेक्ट्रिक, इथेनॉल व ‘सीएनजी’वर चालणाऱ्या बसेस यासारख्या माध्यमातून शहरी परिवहनाच्या संकल्पना बदलत आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.नागपुरातील शासकीय मालकीच्या जागा मेट्रोला हस्तांतरित केल्यामूळे मनपाला कराच्या स्वरूपात लाभ मिळणार आहे. ‘मेट्रो’ही या जागांचा विकास करणार आहे, यामूळे नागपुरातील यशवंत स्टेडियम, संत्रा व खवा मार्केट यांचा विकास होणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘मीट नागपूर मेट्रो’ या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘माझी मेट्रो: अ ड्रीम कमिंग ट्रू’ या प्रदर्शनाचे उद्घाटनदेखील झाले. श्वेता शेलगांवकर यांनी संचालन केले.‘फोर टायर’ प्रणाली असलेले पहिले शहर‘मेट्रो’च्या माध्यमातून नागपूरचा विकास व्हावा यासाठी ‘एनएचएआय’न ेदेखील पुढाकार घेतला. त्यांनी या प्रकल्पासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद केली असून यापैकी ४५० कोटींहून अधिक रक्कम तर देण्यातदेखील आली आहे. दळणवळणाची ‘फोर टायर’ प्रणाली असणारे देशातील नागपूर हे पहिले शहर ठरणार आहे. बहुदा जगातीलदेखील हे पहिलेच शहर ठरेल. यात ‘एनएचएआय’चा मोलाचा वाटा ठरणार आहे, असे गडकरी म्हणाले.ही २१ व्या शतकातील नागपूरची सुरुवातआज केवळ ‘मेट्रो’चीच सुरुवात झालेली नाही, तर हा एकविसाव्या शतकातील प्रगत नागपूरचा प्रारंभ आहे, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. शहरांमध्ये दळणवळणातच नागरिकांचा सर्वात जास्त वेळ जातो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित व मजबूत झाल्यास शहराच्या विकासाला हातभार लागतो. ‘माझी मेट्रो’मुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणाला आळा बसणार आहे. चांगल्या आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे माझी मेट्रो हे प्रतीक ठरणार आहे, असे उद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले. परिवहनपूरक विकास ही संकल्पना आता महत्त्वाची ठरणार आहे. माझी मेट्रो ही अन्य परिवहन व्यवस्थेला जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांचा प्रवासामध्ये खर्च होणारा वेळ व शक्ती वाचणार आहे. मेट्रोच्या परिसरात विविध विकासात्मक कामेही हाती घेण्यात येणार आहेत. ‘माझी मेट्रो’ची स्टेशन्स ही परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरणार आहे. यातून सेवाक्षेत्राद्वारे मोठ्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत. ‘माझी मेट्रो’ ही नागपूरची नवी ओळख ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम लवकरचयावेळी मुख्यमंत्र्यांनी नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली. यासंबंधात मंडळाने आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निविदेला स्वीकृत केले आहे. आता अधिकृतपणे ‘जीएमआर’ कंपनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करेल व येत्या काळात विमानतळाचा चेहरामोहराच बदलून जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.देशातील सर्वात ‘ग्रीन मेट्रो’ ठरेलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘माझी मेट्रो’ ही देशातील सर्वात ‘ग्रीन’ अशी ‘मेट्रो’ ठरेल, असे प्रतिपादन केले. पर्यावरणपूरक असणाऱ्या ‘माझी मेट्रो’मुळे ऊर्जेची बचत होईल व कार्बन उत्सर्जनाला आळा बसणार आहे. माझी मेट्रोसाठी ६५ टक्के ऊर्जा ही सौरऊर्जेतून प्राप्त होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अंबाझरीतील मेट्रो स्थानकाजवळ फूडकोर्ट व बोटपर्यटनाची सुविधा राहणार असून अंबाझरी वनपर्यटनाची संधीही वन मंत्रालयातर्फे उपलब्ध होणार आहे. यामुळे एक पर्यावरण स्नेही मेट्रो म्हणून ‘माझी मेट्रो’ची ओळख निर्माण होईल. लवकरच ‘मेट्रो’ १०० टक्के सौरऊर्जेवर चालेल, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री, गडकरींचा ‘मेट्रो’तून प्रवासयावेळी मुख्यमंत्री, नितीन गडकरी यांच्यासह मान्यवरांनी ‘माझी मेट्रो’तून प्रवास केला. ‘एअरपोर्ट साऊथ स्टेशन’ ते ‘एअरपोर्ट स्टेशन’पर्यंत त्यांनी प्रवास केला. यावेळी दोघांनीही स्थानकांवरील व्यवस्था, तेथील तंत्रज्ञान यांची माहिती घेतली.यांचीदेखील होती उपस्थितीआ.अनिल सोले, आ.सुधाकर देशमुख, आ.सुधाकर कोहळे, आ.समीर मेघे, आ. डॉ.मिलिंद माने, आ.जोगेंद्र कवाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार,पंतप्रधानांनी साधला मराठीतून संवादप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात व शेवट मराठीतून केला. बºयाच वर्षांपासून पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असल्याचा नागपूरकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. यात सहभागी होताना मलादेखील आनंद होत आहे, असे म्हणत त्यांनी सुरुवात केली. तर मी दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाला नक्कीच नागपुरात येईल व ‘माझी मेट्रो’ जगभरात प्रसिद्ध होईल, असे मराठीतून म्हणत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMetroमेट्रो