शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम मोर्चाने वाढवली होती पोलिसांची धडधड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 01:21 IST

मिनिटागणिक वाढणारी मोर्चेकऱ्यांची संख्या आणि गर्दीमुळे व्यापणारे रस्ते बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धडधड वाढवत होते. मात्र, एवढा प्रचंड मोर्चा असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोर्चाचा समारोप झाला अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

ठळक मुद्देशांततेत समारोप : पोलिसांनी टाकला सुटकेचा निश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिनिटागणिक वाढणारी मोर्चेकऱ्यांची संख्या आणि गर्दीमुळे व्यापणारे रस्ते बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धडधड वाढवत होते. मात्र, एवढा प्रचंड मोर्चा असूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोर्चाचा समारोप झाला अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.हिवाळी अधिवेशन आणि भव्य मोर्चे नागपूरकरांसाठी नवीन नाही. पोलिसांना नागपुरात मोर्चे हाताळण्याची सवय झाली आहे. मात्र, देशातील सध्याचे वातावरण लक्षात घेता २० डिसेंबरला सीएए व एनआरसी कायद्याच्या विरोधात निघणारा मुस्लिमांचा मोर्चा लक्षवेधी राहील, असे संकेत मिळाल्यामुळे पोलिसांच्या हृदयाची धडधड वाढली होती. राज्याचे सरकार नागपुरात आहे. मोर्चात काही उलटसुलट झाले तर त्याचे पडसाद देशभर उमटू शकतात, याची कल्पना असल्याने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी खबरदारीचे सर्व उपाय केले होते. मोर्चाच्या आयोजकांसोबत बैठका घेतल्या. कुणीही चिथावणी देणारे भाषण करणार नाही, मोर्चेकरी हिंसक होतील किंवा कुणाच्या भावना दुखावतील, अशा घोषणा करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी पोलीस धोका पत्करायला तयार नव्हते. कारण मोर्चा सुरू होण्यापूर्वी मोर्चात हजारोंच्या संख्येत मंडळी सहभागी होणार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे मोर्चाच्या सुरुवातीपासून तो शेवटच्या पॉर्इंटपर्यंत चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस आयुक्त, सहआयुक्त, सर्वच्या सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि १०० पेक्षा जास्त पोलीस अधिकाºयांसह सुमारे तीन हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. सीसीटीव्ही नेटवर्क, ड्रोन कॅमेरातून मोर्चावर नजर रोखण्यात आली होती. संविधान बचाव या बॅनरखाली चिटणीस पार्क येथून निघालेला हा मोर्चा सेंट्रल एव्हेन्यू, रामझुला मार्गाने एलआयसी चौकातील मोर्चा पॉर्इंटवर पोहचला. मोर्चात मुस्लिमांसोबतच अन्य धर्माचेही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाची संख्या पोलिसांची धडधड वाढवत होती. मात्र,मोर्चा शांततेत पार पडला अन् पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.सर्वांना धन्यवाद : पोलीस आयुक्तधार्मिक आणि सामाजिक सौहार्द जपणारे शहर म्हणून नागपूरची देशभर ख्याती आहे. आजचा एवढा प्रचंड मोर्चा निघाला अन् कोणतीही अनुचित घटना घडली नाही. त्यासाठी मोर्चेकरी अन् नागपूर जनतेचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टॅग्स :Muslimमुस्लीमMorchaमोर्चाPoliceपोलिस