शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील प्राणि संग्रहालये अद्ययावत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 20:53 IST

प्राणिसंग्रहालय तसेच रेस्क्यू सेंटरच्या व्यवस्थेला अधिक प्रभावी तसेच बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या वतीने आधुनिक संसाधनाच्या माध्यमातून अद्ययावत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे मुख्य वनसंरक्षक एस. एस. डोळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देएस. एस. डोळे : महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण सभा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्राणिसंग्रहालय तसेच रेस्क्यू सेंटरच्या व्यवस्थेला अधिक प्रभावी तसेच बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या वतीने आधुनिक संसाधनाच्या माध्यमातून अद्ययावत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे मुख्य वनसंरक्षक एस. एस. डोळे यांनी व्यक्त केले.सेमिनरी हिल्स येथील वन सभागृह येथे महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय तसेच रेस्क्यू सेंटर संचालकांची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस विभागीय वन अधिकारी कमलाकर धामगे, जिजाबाई प्राणिसंग्रहालय मुंबईचे डॉ. संजय त्रिपाठी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईचे शैलेश देवरे, राजीव गांधी वन्यप्राणी संशोधन केंद्र, कात्रज, पुणेचे डॉ. राजकुमार जाधव, निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय चिंचवड, पुणेचे दीपक सावंत, महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय सोलापूरच्या डॉ. शुभांगी ताजने, आमटे प्राणी उद्यान केंद्र हेमलकसा गडचिरोलीचे अनिकेत आमटे, सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय औरंगाबादचे डॉ. बी. एस. नाईकवाडे, महाराज बाग प्राणिसंग्रहालय, नागपूरचे डॉ. सुनील बावस्कर व सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार, पंजाबराव कृषी विद्यापीठ सर्प उद्यान ढोलगरवाडी कोल्हापूरचे तानाजी वाघमारे, पीपल फॉर अ‍ॅनिमल, वर्ध्याचे आशिष गोस्वामी प्रामुख्याने उपस्थित होते.बैठकीत पुढील १० वर्षांसाठी प्राणिसंग्रहालयाचा मास्टर प्लान, नवीन सुधारणा आराखडा, प्राणिसंग्रहालयात अद्ययावत तंत्रज्ञानाचा आणि कल्पकतेचा वापर, परवाना नूतनीकरण व रिक्त पदांची माहिती,लोकप्रबोधन, जनजागृतीची कामे, पर्यटकांसाठी केलेल्या उपाययोजना, प्राणिसंग्रहालयात अतिरिक्त व आवश्यक प्राण्यांच्या बाबतीत आढावा व अदलाबदलीबाबत समन्वय तसेच विविध प्राणिसंग्रहालयास पर्यटकांनी दिलेल्या भेटी व मिळालेला महसूल अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.प्राणिसंग्रहालय तसेच रेस्क्यू सेंटरच्या कामासंदर्भात विविध विभागाच्या संचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवMaharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूर