शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

संग्रहाच्या आवडीने घरालाच बनविले ‘म्युझियम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:03 IST

एखाद्या गोष्टीची आवड असणे आणि त्यासाठी जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करणे हे प्रत्येकालाच जमते असे नाही. परंतु शहरात असे काही लोक आहेत ज्यांनी आपल्या विविध वस्तूंचा संग्रह करण्याच्या छंदातून घरातच एक छोटे संग्रहालय (म्युझियम) तयार केले आहे. ‘जागतिक संग्रहालय’ दिनाच्या पर्वावर ‘लोकमत’ने शहरातील काही संग्रहकर्त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला.

ठळक मुद्देआज जागतिक संग्रहालय दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या गोष्टीची आवड असणे आणि त्यासाठी जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करणे हे प्रत्येकालाच जमते असे नाही. परंतु शहरात असे काही लोक आहेत ज्यांनी आपल्या विविध वस्तूंचा संग्रह करण्याच्या छंदातून घरातच एक छोटे संग्रहालय (म्युझियम) तयार केले आहे. ‘जागतिक संग्रहालय’ दिनाच्या पर्वावर ‘लोकमत’ने शहरातील काही संग्रहकर्त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला.-अर्णवने ‘इरेजर’चा केला संग्रहटिळकनगर येथील रहिवासी पाचव्या वर्गाचा अर्णव हेगे याने विविध आकार व डिझाईनमधील शेकडो खोडरबरचा (इरेजर) संग्रह केला आहे. अर्णवने सांगितले की, जेव्हा तो पहिल्या वर्गात होता तेव्हापासूनच आईकडे हट्ट धरून वेगवेगळ्या आकार व प्रकारातील इरेजर खरेदी करायचा. विशेष म्हणजे, लहान मुलांमध्ये इरेजरला घेऊन आकर्षण असते, परंतु अर्णवने या आकर्षणालाच छंदाचे स्वरूप दिले. आज त्याच्याकडे इरेजरचा मोठा संग्रह आहे. यात सँडल, फ्रॉक, ब्रश, टोपी, बंदूक, अंडी, कार, चष्मा, व्हॅन, विमान, फूल आणि विविध फळांच्या आकारातील इरेजर आहेत. अर्णवने सांगितले, आजही नव्या आकारातील इरेजर दिसल्यास त्याच्या खरेदीचा प्रयत्न असतो.- विविध वस्तूंच्या संग्रहामुळे मिळाले अनेक पुरस्कारगेल्या ३५ वर्षांपासून दीपक संत विविध वस्तूंचे संग्रह करीत आहेत. त्यांच्या या छंदाने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. संत यांच्याकडे विदेशी हॉटेलमधील ७५ प्रकारचे चावीचे कार्ड संग्रहित आहेत. हे चावीचे कार्ड त्यांना मलेशिया, जपान, नेपाळ, भूतान, सिंगापूर, चीन, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आदी देशात जाऊन व विदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडून मिळाले आहेत. हे कार्ड एटीएमसारखेच असते. जेवढ्या दिवसांसाठी हॉटेल बुक केले आहे, तेवढे दिवस हे कार्ड चालते. याशिवाय संत यांच्याकडे विदेशी साबण, राशीवर आधारित गणपतीच्या चित्रांचा मोठा संग्रह त्यांनी केला आहे. या संग्रहामुळेच त्यांना ११ वेळा ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ मिळाले आहेत, सोबतच अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.झिंगाबाई टाकळी, श्रीकृष्णनगर येथील रहिवासी जयंत तांदूळकरची आवड खरंच आश्चर्य व्यक्त करणारी आहे. त्यांच्याकडे बासापासून तयार केलेले घोडे, बैलगाडी यांच्यासह काचेच्या बॉटल्सच्या आत ‘लेटर बॉक्स’, आगपेटी, फ्लॉवर पॉट, पेन स्टॅण्ड आदी वस्तू त्याने मोठ्या कुशलतेने टाकल्या आहेत. तांदूळकरने सांगितले, लहानपणापासून याची आवड होती. त्यांनी काचेचे ताजमहालही साकारले आहे, आता ते बॉटल्सच्या आत टाकण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी तयार केलेली बासाची खाट, सोफा, लॅम्प, टांगा, पितळेची छोटी बोअरवेल, छोटा टिफीन बॉक्स आदी वस्तू पाहण्यासारख्या आहेत. आश्चर्य म्हणजे तांदूळकर यांनी पाऊण इंचाची भगवद्गीता तयार केली आहे.जुनी भांडी संग्रहित करण्याची आवडमेयोमध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विभा मोडक यांना जुन्या काळातील भांड्यांचा संग्रह करण्याची आवड आहे. त्यांनी आतापर्यंत मोठ्या संख्येत याचा संग्रह केला आहे. त्यांच्यानुसार नव्या पिढीला या जुन्या वस्तूंची माहिती व्हावी, त्यांना ते पाहता यावे या उद्देशाने त्यांनी हा संग्रह केला आहे. गेल्या १८ वर्षांपासून त्यांचा हा छंद सुरू असून, यात माती व सिरॅमिकच्या शेकडो भांड्यांचा संग्रह आहे. ते स्वत:ही मातीच्या भांड्यामध्ये जेवण तयार करतात. त्यांनी आपले घर या संग्रहाच्या माध्यमातून उत्तम सजविले आहे. 

टॅग्स :artकलाnagpurनागपूर