शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची हत्या करणारा निघाला ‘लिव्ह इन पार्टनर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2022 21:39 IST

Nagpur News कळमना येथील शेतात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेच्या हत्येचे गूढ दोन दिवसांनी उकलले आहे. तिच्या लिव्ह इन पार्टनरनेच तिची हत्या केली.

ठळक मुद्देसंशयावरून वाद, भावाच्या मदतीने फेकला मृतदेह

नागपूर : कळमना येथील शेतात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेच्या हत्येचे गूढ दोन दिवसांनी उकलले आहे. तिच्या लिव्ह इन पार्टनरनेच तिची हत्या केली. दोघांमध्ये संशयावरून वाद झाला व त्यातून तिच्या पार्टनरने तिची हत्या केली. त्याने भावाच्या मदतीने मृतदेह शेतात आणून फेकला. रजनी राधेश्याम पेंदाम (२७) असे मृत महिलेचे नाव असून, पोलिसांनी घनश्याम सुधाकर उईके (३३, नवकन्या नगर) तसेच त्याचा भाऊ लोकेश उईके (२३, विजय नगर) यांना अटक केली आहे.

दोन दिवसांअगोदर कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा मृतदेह आढळला होता. तिच्या हातावर आर असे कोंदलेले होते. पोलिसांना खबऱ्यांच्या मार्फत तिच्या आईची माहिती कळाली. आईने मृतदेहाची ओळख पटविली व रजनी पती व मुलांना सोडून तीन वर्षांपासून घनश्यामसोबत वेगळी राहत होती. घनश्यामच्या पत्नीचा मृत्यू झाला असून त्याची मुले आजी-आजोबांकडे राहतात. रजनी आणि घनश्याम हे कामगार म्हणून काम करायचे. ते एकमेकांवर संशय घेत असत, त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे.

घनश्याम २७ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता कामावरून घरी पोहोचला. घरी उशिरा येण्यावरून रजनीशी त्याचा वाद झाला. दरम्यान, घनश्यामने रजनीला खाली पाडले व तिचे डोके जमिनीवर आपटले. त्यानंतर दुपट्ट्याने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. उपायुक्त श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद पाटील, देवाजी नरोटे, राहुल सावंत, उत्तम जायभाये, विवेक झिंगरे, गंगाधर मुरकुटे, अजय गर्जे, दीपक धानोरकर, रवी साहू यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दुचाकीवरून नेला मृतदेह

घनश्यामने रजनीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी भाऊ लोकेश याला रात्री अकरा वाजता दुचाकीने घरी बोलावले. त्याने रजनीचा मृतदेह चादरने गुंडाळला व कळमना येथील पावन गावाजवळील शेतात तिचा मृतदेह फेकून दिला. रजनीच्या आईने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घनश्यामला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घनश्याम व लोकेशला अटक केली आहे.

.. .. .. .. .. ..

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी