शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खून करून मृतदेह पेट्राेल टाकून जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : दारू प्यायल्यानंतर तिघांनी त्यांच्या मित्राच्या मित्रास बेदम मारहाण करीत राेडच्या कडेला फेकून दिले व ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : दारू प्यायल्यानंतर तिघांनी त्यांच्या मित्राच्या मित्रास बेदम मारहाण करीत राेडच्या कडेला फेकून दिले व घराकडे परत आले. त्यानंतर तिघेही परत घटनास्थळी गेले. त्यांनी ताे जिवंत असल्याचे दिसताच त्याचा आधी गळा चिरून खून केला आणि नंतर अंगावर पेट्राेल व टायर टाकून पेटवून दिले. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (पर्बत) शिवारात गुरुवारी रात्री घडली असून, या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

अंगद ऊर्फ बिट्टू अशोक कडूकर (२८, रिधाेरा, ता. काटाेल) असे मृताचे तर अक्षय रामदास घिचेरिया (३१, रा़ रेस्ट हाऊसजवळ काटोल), मंगेश एकनाथ जिचकार (३२, रा़ धवड लेआऊट, काटाेल) व गणेश चिरकुट नैताम (५२, रा़ धर्मशाळामागे, तारबाजार काटोल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत़ अंगद हा अमाेल नागपुरे व वैभव हिवसे दाेघेही रा. रिधाेरा यांच्यासाेबत गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एमएच-०४/एडब्ल्यू-५१२३ क्रमांकाच्या क्वाॅलीसने जेवण करण्यासाठी काटाेल येथील झुनका भाकर केंद्रात आले हाेते. ती क्वाॅलीस अंगदच्या मालकीची आहे. तिथे तिघेही दारू पीत बसले. जवळच वैभवचा मित्र आराेपी मंगेश व त्याचे मित्र अक्षय व गणेश दारू पीत हाेते.

दरम्यान, वैभवला दारू जास्त चढली असून, त्याला गावाला साेडून देण्याची बतावणी करीत मंगेश, अक्षय व गणेश क्वाॅलीसमध्ये बसले. अमाेल मात्र झुनका भाकर केंद्रातच हाेता. हे पाचही जण रिधाेऱ्याच्या दिशेने निघाले आणि परत काटाेल आले. त्यांनी वैभवला काटाेल येथील बसस्थानकाजवळ साेडले व तिघेही अंगदला घेऊन डाेंगरगावकडे निघून गेले. त्या तिघांनीही अंगदला क्वाॅलीसमध्ये बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याला परत सावळी (पर्बत) शिवारात आणले व तिथे राेडलगत फेकून तिघांनीही घर गाठले.

आराेपींपैकी एकाने या कृत्याबाबत एकाला सांगितले. त्यामुळे कुणाला मारले हे बघण्यासाठी तिन्ही आराेपी व अन्य दाेघे माेटरसायकलने सावळी (पर्बत) शिवारात पाेहाेचले. त्यांनी अंगदचा शाेध घेताला. ताे जिवंत असल्याचे दिसून येताच अक्षयने त्याचा चाकून गळा चिरला. त्यानंतर काटाेलला परत येऊन त्यांनी साेबत पेट्राेल व टायर घेऊन घटनास्थळ गाठले. तिघांनीही अंगदच्या अंगावर पेट्राेल ओतून व टायर ठेवून त्याचा जाळले, अशी माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपींना अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बाेंद्रे करीत आहेत.

....

खुनाचे कारण अस्पष्ट

अंगद रात्री घरी परत न असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शाेध घेतला. ताे आराेपींसाेबत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आराेपींना अंगदबाबत विचारपूस केली. मात्र, ताे यापूर्वीच गेल्याची माहिती आराेपींनी अंगदच्या कुटुंबीयांना दिली. त्यांनी क्वाॅलीसची बारकाईने पाहणी केली असता, त्यांना तुटफूट झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे अंगदसाेबत अनुचित प्रकार झाल्याचा त्यांना संशय आला. त्यातच अंगदचा खून करण्यात आल्याची माहिती देवेंद्र खरपुरियाने पाेलिसांना दिली. तिन्ही आराेपी अट्टल व्यसनी असून, त्यांनी अंगदचा खून नेमका कशासाठी केला, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.