शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वाठोड्यात तरुणाची हत्या : परिसरात थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 23:14 IST

अज्ञात कारणावरून एका तरुणाची दोन आरोपींनी निर्घृण हत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला होता.

ठळक मुद्देअज्ञात आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अज्ञात कारणावरून एका तरुणाची दोन आरोपींनी निर्घृण हत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला होता. यश मधुकर ठाकरे (वय १९) असे मृत तरुणाचे नाव असून तो हुडकेश्वरमधील झोपडपट्टीत राहत होता. यश ठाकरेविरुद्ध काही महिन्यांपूर्वी लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला कारागृहात डांबले होते. मे महिन्यात तो कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याने क्वारंटाईन करण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, यश काही दिवसांपासून एका पेट्रोल पंपावर काम करत होता. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राऊतनगरजवळ पडून असल्याची माहिती कळाली. त्यामुळे वाठोड्याचे ठाणेदार अनिल ताकसांडे आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे धावले. आरोपींनी यशच्या शरीरावर धारदार शस्त्राने अनेक घाव घालून त्याला ठार मारले होते. दरम्यान, माहिती कळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनीही घटनास्थळी भेट दिली. ही हत्या दोन आरोपींनी केल्याचा संशय आहे. मात्र कुणी आणि कोणत्या कारणामुळे केली ते ते रात्री १० वाजेपर्यंत उघड झाले नव्हते. आरोपींचा शोध घेण्यासाठी वाठोडा पोलिसांची पथके वेगवेगळ्या भागात चौकशी करत होती. पोलीस उपायुक्त मासाळ हेसुद्धा पोलीस ठाण्यात संशयितांची चौकशी करीत होते.अनेकांची धरपकडया गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी अनेक संशयितांची धरपकड केली. पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी सुरू होती. ठाकरेची हत्या कोणत्या कारणामुळे झाली ते जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून त्याच्या आई-वडिलांना आणि नातेवाईकांनाही विचारणा केली जात होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून