किरकाेळ वादातून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:10 AM2021-03-31T04:10:10+5:302021-03-31T04:10:10+5:30

उमरेड : किरकाेळ कारणावरून उद‌्भवलेला वाद विकाेपास गेला आणि त्यातून दाेघांनी चाकूने वार केले. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. ...

Murder of a young man over a minor dispute | किरकाेळ वादातून तरुणाचा खून

किरकाेळ वादातून तरुणाचा खून

Next

उमरेड : किरकाेळ कारणावरून उद‌्भवलेला वाद विकाेपास गेला आणि त्यातून दाेघांनी चाकूने वार केले. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना उमरेड शहरातील कावरापेठ परिसरात मंगळवारी (दि. ३०) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

संजय इस्तारी खवास (३६, कावरापेठ, उमरेड) असे मृत तरुणाचे तर महादेव बाळूजी मोहिनकर (२१) व विजय डहारे (२३) दाेघेही रा. कावरपेठ, उमरेड अशी आराेपींची नावे आहेत. महादेव व विजयचे साेमवारी (दि. २९) रात्री संजयसाेबत किरकाेळ कारणवरून भांडण झाले हाेते. भांडण मिटल्यानंतर तिघेही आपापल्या घरी निघून गेले हाेते. दरम्यान, मंगळवारी रात्री पुन्हा त्यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. भांडण विकाेपास जाताच महादेव व विजयने संजयला मारहाण करायला सुरुवात केली. त्यातच दाेघांनी संजयवर चाकूने वार केले. जाे जखमी अवस्थेत काेसळताच दाेघांनी तिथून पळ काढला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले व जखमी संजयला ग्रामीण रुग्णालयात नेले. डाॅक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घाेषित केले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पाेलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली हाेती.

Web Title: Murder of a young man over a minor dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.