लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल मार्गावरील दाभा येथील जगदीशनगर जवळ राहणाऱ्या शबनम शहजाद खान (वय २३) हिची सोमवारी रात्री सोनू तौसिफ शेख (रा. जगदीशनगर) याने निर्घृण हत्या केली.शबनम गरीब कुटुंबातील तरुणी असून, तिला तीन लहान बहिणी आहेत. ती एका क्लिनीकमध्ये काम करायची. वडील रिक्षा चालवतात. तिची सोनूसोबत मैत्री होती. नेहमीप्रमाणे ती सोमवारी रात्री घरून क्लिनीकला जायला निघाली. मात्र, तेथे पोहचलीच नाही. त्यामुळे डॉक्टरने फोन करून विचारणा केली. तिचा मोबाईल बंद होता.मंगळवारी दुपारी एका नाल्यात शबनमचा मृतदेह आढळला. संपूर्ण कपडे रक्ताने माखले होते. त्यावरून तिची हत्या केल्याचे लक्षात येत होते. माहिती कळताच गिट्टीखदान पोलीस पोहचले. शबनमची हत्या धारदार शस्त्राचे घाव घालून आणि गळा दाबून गेल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. आरोपी सोनू फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नागपूरनजीक दाभ्यात तरुणीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:31 IST
काटोल मार्गावरील दाभा येथील जगदीशनगर जवळ राहणाऱ्या शबनम शहजाद खान (वय २३) हिची सोमवारी रात्री सोनू तौसिफ शेख (रा. जगदीशनगर) याने निर्घृण हत्या केली.
नागपूरनजीक दाभ्यात तरुणीची हत्या
ठळक मुद्देप्रेमप्रकरणातून वाद ? प्रियकरावर संशय