शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्रिटींग प्रेसच्या मालकाची हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:49 IST

एका ३६ वर्षीय प्रिंटींग प्रेस मालकाची हत्या करण्यात आली. ही घटना हुडकेश्वर आऊटर रिंग रोडवर घडली. मृतदेह रस्त्याच्या काठावर फेकून हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी रात्री ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्देहुडकेश्वर आऊटर रिंग रोडवर मिळाला मृतदेह : डोक्यावर गंभीर वार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका ३६ वर्षीय प्रिंटींग प्रेस मालकाची हत्या करण्यात आली. ही घटना हुडकेश्वर आऊटर रिंग रोडवर घडली. मृतदेह रस्त्याच्या काठावर फेकून हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी रात्री ही घटना घडल्याचा अंदाज आहे.संजय धनराज चव्हाण रघुजीनगर क्वॉर्टर नं. ५/१२६ असे मृताचे नाव आहे. संजयची गणेशपेठ येथे प्रिंटींग प्रेस आहे. मंगळवारी रात्री ९.३० वाजता संजय घरातून बाहेर पडला. तेव्हापासून तो घरी परत आला नव्हता. हुडकेश्वर पोलिसांना बुधवारी पहाटे २ वाजता रिंग रोडवर ओरिएंटल कंपनीजवळ रस्त्यावर अपघात झाल्याची सूचना मिळाली. संजय रस्त्याच्या काठावरील नालीत मृतावस्थेत आढळून आला. त्याची तपासणी केली असता संजयच्या डोक्यावर शस्त्राने वार केल्याचे उघडकीस आले. संजयची हत्या कुणी व का केली याचा शोध घेतला जात आहे. मृताचा भाऊ अजय चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून