शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या : खंडणीसाठी शिवीगाळ केल्याने घडला थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:49 IST

खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे चाकू दाखवून अश्लील शिवीगाळ करणारा कुख्यात गुंड नित्या ऊर्फ नितीन कुळमेथे याची चाकूचे घाव घालून तसेच विटांनी ठेचून अमानुष हत्या केली. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास तकिया धंतोली परिसरात घडलेल्या या थरारक हत्याकांडाने पुन्हा एकदा उपराजधानीत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देधंतोलीत गुन्हा, दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे चाकू दाखवून अश्लील शिवीगाळ करणारा कुख्यात गुंड नित्या ऊर्फ नितीन कुळमेथे याची चाकूचे घाव घालून तसेच विटांनी ठेचून अमानुष हत्या केली. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास तकिया धंतोली परिसरात घडलेल्या या थरारक हत्याकांडाने पुन्हा एकदा उपराजधानीत खळबळ उडाली आहे.नित्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, त्याला यापूर्वी तडीपारही करण्यात आले होते. २००९ पासून नित्या गायब झाला होता. त्याची पत्नी पारिचारिका असून, ती पंढरपूरला नोकरीला असल्यामुळे नित्या तिकडे गेल्याचे म्हटले जात होते.तर, काही जण तो कारागृहात असल्याचे सांगत होते. महिनाभरापूर्वी नित्या धंतोलीत परतला. त्याने पुन्हा गुंडगिरी सुरू केली. परिसरातील छोट्या-मोठ्यादुकानदाराकडून, अवैध धंदेवाल्याकडून नित्या खंडणी वसुली करीत होता. सोमवारी दुपारी त्याने दारूच्या नशेत खंडणीसाठी हैदोस घालणे सुरू केले. त्याने अनेकांना नको तशा शिव्या घातल्या. त्यामुळे या भागात मटका चालविणारे, दारूची लपूनछपून विक्री करणारे संतप्त झाले. आरोपी पंकज राऊत, मंगेश सोनवणे यांनी त्याचा काटा काढण्याची तयारी केली. दुपारी ४ च्या सुमारास नित्या खंडणी मागायला आला. त्याने शिवीगाळ सुरू केल्याने राऊत आणि सोनवणेसोबत त्याचा वाद झाला. दारूच्या नशेतील नित्याने चाकू काढून मारण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्याच्यावर लाकडी फळीने जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर त्याच्या हातातून चाकू हिसकावला. त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. एवढेच नव्हे तर आरोपींनी त्याला विटांनीही ठेचून काढले. अनेकांसमोर हा थरारक प्रकार घडला; मात्र नित्याच्या मदतीला कुणीही धावले नाही. आरोपी तेथून निघून गेल्यानंतर तेथे बघ्यांची प्रचंड गर्दी जमली.एकाने नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळविला; नंतर धंतोलीचे ठाणेदार प्रसाद सणस आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. तोपर्यंत नित्याचा मृत्यू झाला होता. माहिती कळताच परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिसही पोहचले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी नित्याचा मृतदेह मेडिकलमध्ये पाठविला. आरोपी राऊत आणि सोनवणे या दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून