शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या नंदनवनमधील मर्डर मिस्ट्री ; नराधमास मिळाला नाही वकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:26 IST

स्वत:चा मुलगा, बहीण, भाची, जावई आणि त्यांची आई अशा पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

ठळक मुद्दे ३० जूनपर्यंत पीसीआर : सुरक्षेसाठी पोलिसांची खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:चा मुलगा, बहीण, भाची, जावई आणि त्यांची आई अशा पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.नंदनवनमधील आराधनानगरात राहणारे कमलाकर पवनकर यांच्या घरात शिरून ११ जूनच्या पहाटे ३ च्या सुमारास क्रूरकर्मा पालटकरने जावई कमलाकर, बहीण अर्चना पवनकर, भाची वेदांती, कमलाकरची आई मीराबाई तसेच स्वत:चा पाच वर्षांचा मुलगा कृष्णा पालटकर याची लोखंडी सब्बलचे फटके मारून निर्घृण हत्या केली होती. हे हत्याकांड घडवून आणल्यानंतर आरोपी दिल्लीला पळाला. तेथून तो लुधियानाला पोहचला. तेथे एका बिहारी मजुराच्या माध्यमातून त्याने सैनीवाल भागातील इंडस्ट्री परिसरातील एका कंपनीत काम धरले. बाजूलाच एका चाळीत तो भाड्याच्या खोलीत राहू लागला. गुरुवारी त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने लुधियानात जेरबंद केले. तेथून त्याला शुक्रवारी सायंकाळी नागपुरात आणले. आज शनिवारी त्याला न्या. जी. सी. फुलझलके यांच्या न्यायालयात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मुकुंद साळुंके यांनी हजर केले. मुख्य जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी आरोपी पालटकर याने एकापेक्षा जास्त हत्यारांचा वापर करून मृतांचे डोके छिन्नविछिन्न केले. त्यामुळे ते हत्यार कोणते, त्याचा शोध घ्यायचा आहे. आरोपी वर्षभरापूर्वी कारागृहातून बाहेर आला, या कालावधीत तो कुठे कुठे वास्तव्याला होता, ते शोधायचे आहे. हत्या करताना आरोपीने जी क्रूरता दाखवली ती कोणत्या कारणामुळे, त्याची माहिती मिळवायची आहे. हा गुन्हा करण्यासाठी आरोपीला कुणी चिथावणी दिली काय किंवा त्याचा कुणी साथीदार आहे काय, त्याची माहिती मिळवायची आहे, असे मुद्दे न्या. फुलझलके यांच्यासमोर मांडले. त्याचा २ जुलैपर्यंत पीसीआर मिळावा, अशी विनंती केली. न्यायालयाने आरोपीला ३० जूनपर्यंत पीसीआर मंजूर केला.---आरोपीला वकील मिळाला नाहीया हत्याकांडाने केवळ पवनकर कुटुंबीयच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्याही भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे आरोपीच्या बाजूने आज कोणत्याच वकिलाने न्यायालयात बाजू मांडली नाही. आरोपीला न्यायालयात हजर करताना अनुचित घटना घडू शकते, हे ध्यानात घेत पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.

 

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर