शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशीच प्रेयसीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:30 IST

सर्वत्र व्हॅलेन्टाईन डे चा फिवर चढला असताना दिघोरीतील एका प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून त्याच्या प्रेयसीची हत्या केली. एवढेच नव्हे तर तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावरील झुडूपात फेकून आरोपी पळून गेला. मात्र, सकाळी मृतदेह आढळताच गुन्हे शाखेच्या पथकाने या हत्या प्रकरणाचा छडा लावून आरोपी रवींद्र गुलाबराव लांडगे (वय ३०, रा. वैभव नगर, दिघोरी) याच्या मुसक्या बांधल्या.

ठळक मुद्देसंशयामुळे वाद विकोपाला : धारदार शस्त्राने कापला गळा नंदनवनमध्ये गुन्हा, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वत्र व्हॅलेन्टाईन डे चा फिवर चढला असताना दिघोरीतील एका प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून त्याच्या प्रेयसीची हत्या केली. एवढेच नव्हे तर तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावरील झुडूपात फेकून आरोपी पळून गेला. मात्र, सकाळी मृतदेह आढळताच गुन्हे शाखेच्या पथकाने या हत्या प्रकरणाचा छडा लावून आरोपी रवींद्र गुलाबराव लांडगे (वय ३०, रा. वैभव नगर, दिघोरी) याच्या मुसक्या बांधल्या.मृत संगीता सोनकुसरे (वय ३०) पाचपावलीतील तांडापेठमध्ये राहत होती. हे दोघे ताजाबादमध्ये यायचे. तेथे ओळखी, मैत्री आणि नंतर त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी रवींद्रच्या वैभवनगरातील घरात हे दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. मात्र आठवडाभरातच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन रवींद्र संगीताला मारहाण करू लागला. गुरुवारी अशाच पद्धतीने त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. रवींद्रने संगीताला जोरदार मारहाण केली तर संगीतानेही त्याच्या कानशिलात लगावल्या. त्यामुळे त्याने संगीताचा धारदार शस्त्राने गळा कापला. पहाटेच्या वेळी संगीताचा मृतदेह त्याने घरापासून काही अंतरावर असलेल्या राऊतनगरातील संपदा कॉन्व्हेंटजवळच्या काटेरी झुडूपात फेकला आणि पळून गेला. शुक्रवारी सकाळी ९.४५ ला ही घटना उघडकीस आल्यानंतर तेजराम परसराम बोंभाटे (वय ६१) यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. माहिती कळताच नंदनवन पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करू लागले. संगीता आरोपी रवींद्र सोबत राहत होती, हे समजताच गुन्हे शाखा पोलिसांनी त्याचे घर गाठले. तेथे त्याच्या कपड्यावर आणि घरात रक्ताचे डाग दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याची चौकशी करताच त्याने हत्येची कबुली देऊन कारणही सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला नंदनवन पोलिसांच्या हवाली केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून