शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नागपूर जिल्ह्यातील मोहगाव येथे शेतीच्या वादातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:12 IST

वडिलोपार्जित शेती हडपल्याच्या  वादातून मोठ्या भावाने दुचाकीवर असलेल्यांवर काठीने वार केला. त्यात लहान भाऊ गंभीर जखमी झाला तर त्याच्या मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव-पिपळा (केवळराम) मार्गावरील मोहगाव (भदाडे) येथे रविवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देअन्य एक जखमी, वडिलोपार्जित शेती हडपल्याच्या  वादातून  घडला थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनरखेड : लहान भावाने त्याच्या अन्य एक भावाची आणि चार बहिणींची शेती हडपल्यानंतर उरलेल्या दोन भावांची शेती हडपण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्याने दोन्ही भावांना फोनवर धमकी देण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर तो त्याच्या दोन मित्रांना घेऊन भावाच्या घरी भांडण करायला गेला. लहान भाऊ व त्याचे दोन मित्र मोटरसायकलवर असतानाच मोठ्या भावाने दुचाकीवर असलेल्यांवर काठीने वार केला. त्यात लहान भाऊ गंभीर जखमी झाला तर त्याच्या मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य एक मित्र पळून गेला ही घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव-पिपळा (केवळराम) मार्गावरील मोहगाव (भदाडे) येथे रविवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली. यात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.अमोल रमेश अटाळकर (३२, रा. काटोल) असे मृताचे तर वैभव प्रकाश कावडकर (३१, रा. काटोल) असे जखमीचे नाव असून, बालाजी काशिनाथ कावडकर (४८) व चंद्रभान काशिनाथ कावडकर (५०) दोघेही रा. मोहगाव (भदाडे), ता. नरखेड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वैभव हा मूळचा मोहगाव (भदाडे) येथील रहिवासी असून, तो काटोल येथे स्थायिक झाला. वैभव, बालाजी व चंद्रभान हे भाऊ असून, त्यांना आणखी एक भाऊ व चार बहिणी आहेत. त्यांच्याकडे एकूण साडेसात एकर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीची वाटणी झाली असून, प्रत्येकाच्या वाट्याला ३३ आर शेती आली.वैभवला मात्र संपूर्ण शेती हवी होती. त्याने मध्यंतरी खटाटोप करून चार बहिणींची तसेच एका भावाची शेती स्वत:च्या नावे करून घेतली. त्यानंतर त्याची नजर बालाजी व चंद्रभान यांच्या प्रत्येकी ३३ आर शेतीकडे गेली. त्याला या दोघांचीही शेती हवी असल्याने त्याने त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. दोघांचीही शेती विकत घेण्याची वैभवने तयारी दर्शवली होती. त्यामुळे त्याने बालाजी व चंद्रभानकडे तगादा लावला होता. दोघेही जुमानत नसल्याने त्याने दोघांसोबत भांडणे करण्यासोबतच फोनवर वारंवार धमक्या देणे सुरू केले. वैभव दोन मित्रांना घेऊन मोहगाव येथे दोघांसोबत भांडण करण्याच्या उद्देशाने गेला होता. तिघेही मोटरसायकलवर असतानाच बालाजी व चंद्रभानने काठी व कुऱ्हाडीने   तिघांवर वार केले. त्यात अमोलचा मृत्यू झाला तर वैभव गंभीर जखमी झाला.दुचाकीवर असतानाच केला वारबालाजी व चंद्रभानसोबत भांडण करण्यासाठी वैभव त्याचा मित्र अमोल अटाळकर व तिलक ऊर्फ ईलू राजकुमार हाटे (२६, रा. अन्नपूर्णानगर, काटोल) यांना सोबत घेऊन मोटरसायकलने रविवारी दुपारी मोहगाव (भदाडे) येथे गेला. तिलक दुचाकी चालवित होता तर, वैभव मध्ये आणि अमोल मागे बसला होता. तिघेही बालाजीच्या घराजवळ घुटमळत असतानाच बालाजीच्या मुलीने वडिलांना याबाबत माहिती दिली. बालाजी व चंद्रभानने लगेच घर गाठले. तिघेही मोटरसायकलने घराजवळून हळूहळू जात असताना बालाजीने काठीने वार केला. पहिला वार मागे बसलेल्या अमोलवर झाला तर दुसरा वैभववर झाला. त्यात दोघेही जखमी झाले.उपचारादरम्यान मृत्यूताबा सुटल्याने दुचाकी खाली कोसळली. दोघेही जखमी झाल्याचे लक्षात येताच तिलकने दुचाकीसह पळ काढला. माहिती मिळताच सावरगाव पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले त्यांनी दोन्ही जखमींना लगेच नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले. शिवाय, आरोपी बालाजी व चंद्रभानला ताब्यात घेत अटक केली. अमोलचा मेयोमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला तर वैभववर उपचार सुरू आहेत. तो बेशुद्ध असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीपोलिसांनी आरोपी बालाजी व चंद्रभानला भादंवि ३०२, ३०७, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखन करून अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून काठी व कुऱ्हाड जप्त केली. दोघांनाही सोमवारी दुपारी नरखेड येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी पुरी यांच्या न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने दोघांनाही गुरुवारपर्यंत (दि. २५) पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास नरखेडचे ठाणेदार दिलीप मसराम करीत आहेत.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर