शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:51 IST

शनिवारी सायंकाळी कळमन्यातील कुख्यात गुंड राजेश महादेवराव खडसे (वय ४०) याची त्याच्या भांडेवाडीतील घरात शिरून सशस्त्र आरोपींनी निर्घृण हत्या केली. त्याने दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप होता. दोन-तीन दिवसांपूर्वीच राजेश कारागृहातून बाहेर आला होता, हे विशेष.

ठळक मुद्देनागपूरच्या भांडेवाडीत थरार : कळमन्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी सायंकाळी कळमन्यातील कुख्यात गुंड राजेश महादेवराव खडसे (वय ४०) याची त्याच्या भांडेवाडीतील घरात शिरून सशस्त्र आरोपींनी निर्घृण हत्या केली. त्याने दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप होता. दोन-तीन दिवसांपूर्वीच राजेश कारागृहातून बाहेर आला होता, हे विशेष.शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास भांडेवाडीतील राजेशच्या घराच्या दारातून रक्ताचा लोट बाहेर आल्याचे पाहून शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी कळमना पोलिसांना माहिती दिली. पोलीस पथकाने राजेशचे घर गाठले तेव्हा तेथे मोठी गर्दी जमली होती. राजेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. त्याचा गळा कापण्यात आला होता. शरीरावर एकूण तीन खोलवर घाव होते. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह रुग्णालयात पाठवला.विशेष म्हणजे, ज्याप्रमाणे आज शनिवारी, राजेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, त्याची पत्नी मंगला हिचा देखील मृतदेह दोन वर्षांपूर्वी असाच पडून होता. राजेशने तिची हत्या केल्याच्या आरोपावरून २०१६ मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला कारागृहात डांबल्यानंतर मंगला हत्याकांडाची सुनावणी न्यायालयात सुरू झाली. या प्रकरणात बहुतांश साक्षीदार मंगला आणि राजेशचे नातेवाईकच होते. तरीदेखील अनेकांनी सुनावणीदरम्यान विसंगत बयाण दिले. दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वीच राजेश कारागृहातून बाहेर आला होता. तो दुपारी त्याच्या घरात झोपला असावा, त्याच अवस्थेत त्याची गळा कापून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. या हत्याकांडात त्याच्या किंवा मंगलाच्या नातेवाईकांपैकीच कुणी असावे, असा पोलिसांचा कयास आहे. तूर्त कळमना पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर