शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या नरसाळ्यातील हत्या उधारीच्या वादातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 22:43 IST

उमरेड मार्गावरील नरसाळ्याच्या सुदामनगरीत एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशाल ऊर्फ प्रदीप दिलीप मानकर (वय २१) असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देआरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेड मार्गावरील नरसाळ्याच्या सुदामनगरीत एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशाल ऊर्फ प्रदीप दिलीप मानकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. तो तुळजाईनगर, गारगोटी परिसरात राहत होता.शनिवारी सकाळी विशाल मानकरचा मृतदेह नरसाळा परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली. काहींनी सकाळी ७ वाजता ही माहिती हुडकेश्वर पोलिसांना कळवली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. विशालच्या मृतदेहाशेजारी दगड आणि दारूची बाटली पडून होती. त्याच्या खिशात असलेल्या व्हिजिटिंग कार्डवरून त्याचे नाव व पत्ता स्पष्ट झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोठा भाऊ संदीप (वय २३) याला बोलवून घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशालच्या मित्रांपैकी रोहित ऊर्फ छोट्या हरीश शाहू (वय २३, रा. सुदामनगर, दिघोरी) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने विशालच्या खुनाची कबुली दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल कॅटरर्सचे काम करायचा. फावल्या वेळेत तो जुने फर्निचर विकत घेणे आणि ते चांगले करून विकण्याचे काम करायचा. आरोपी शाहूसोबत त्याची मैत्री होती. शाहू सेंट्रिंगचे काम करतो. विशालने दीड वर्षापूर्वी शाहूकडून ४० हजार रुपये उधार घेतले होते. ते परत करण्यासाठी तो टाळाटाळ करीत होता.नकार आणि धमकी भोवलीशुक्रवारी रात्री १० च्या सुमारास हे दोघे गारगोटी परिसरातील नाल्याजवळच्या मैदानात दारू पीत बसले. शाहूने पैशाचा विषय काढताच विशालने त्याला पैसे देण्यास नकार दिला. तुला जे करायचे ते कर, असे म्हणत शिवीगाळ करून धमकीही दिली. त्यामुळे संतापलेल्या शाहूने बाजूचा दगड उचलून विशालचे डोके ठेचले. विशाल ठार झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी पळून गेला. आरोपीने हा घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर, उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी किशोर सुपारे, हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने, द्वितीय निरीक्षक किशोर चौधरी, अरविंद भोळे, पीएसआय भावेश कावरे, सचिन धर्मोजवार, हवालदार यादव, नायक नीलेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर