शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जन्मदात्रीला मारणाऱ्या भावाची हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:50 IST

जन्मदात्या आईला नेहमी मारहाण करणाऱ्या दारुड्या भावाची त्याच्या मोठ्या भावाने हत्या केली. जागनाथ बुधवारी परिसरातील सावजी गल्लीत शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.

ठळक मुद्देदारुड्याच्या त्रासापासून सुटका : आधार देणारा कारागृहात : वृद्धेची अवस्था वाईट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्मदात्या आईला नेहमी मारहाण करणाऱ्या दारुड्या भावाची त्याच्या मोठ्या भावाने हत्या केली. जागनाथ बुधवारी परिसरातील सावजी गल्लीत शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.राजू रामभाऊ आमदे (वय ४२) असे आरोपीचे तर संजय रामभाऊ आमदे (वय ४१) असे मृताचे नाव आहे. रामभाऊ आमदे पोलीस दलात उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले. ते सावजी गल्लीत राहायचे. त्यांचा लहान मुलगा संजय याला दारूचे भारी व्यसन होते. तो दारूच्या नशेत घरी येऊन पत्नी आणि आईला बेदम मारहाण करायचा. या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली. तेव्हापासून संजय दारू पिऊन घरी आला की अश्लील शिवीगाळ करून आईला बेदम मारहाण करीत होता. त्याला वारंवार समजावून ही तो सुधारत नसल्याने घरच्यांसोबतच शेजारची मंडळीही त्याचा राग करायची. गुरुवारी रात्री तो अशाच प्रकारे दारूच्या नशेत टून्न होऊन आईला मारहाण करू लागला. मध्यरात्रीनंतरही त्याची मारहाण आणि शिवीगाळ सुरुच होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मोठा भाऊ राजूने त्याला कपडे धुण्याच्या मोगरीने बदडले. परिणामी त्याचा मृत्यू झाला. पहाटे २ च्या सुमारास हा प्रकार उघड झाला. त्यानंतर पश्चात्तापाने पोळलेला राजू थेट तहसील ठाण्यात पोहचला. त्याने ती मोगरी पोलिसांच्या हवाली करून संजयच्या हत्येची माहिती दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. मारहाण करणाऱ्या संजयपासून कायमची सुटका मिळाली असली तरी वृद्धावस्थेतील आधार असलेला राजू कारागृहात पोहचल्याने वृद्ध आईची अवस्था वाईट झाली आहे. 

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर