शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

पूर परिस्थितीसाठी मनपाला सहा बोटी

By admin | Updated: June 23, 2015 02:25 IST

पावासाळ्यात शहरात पूर परिस्थिती उद्भवल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हा

आपत्ती निवारण : जिल्हा प्रशासनाची मनपाला साथ नागपूर : पावासाळ्यात शहरात पूर परिस्थिती उद्भवल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे महापालिकेला सहा बोटीसह विविध आवश्यक साहित्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचते. अशा वेळी लोकांना बाहेर काढणे कठीण जाते. या पार्श्वभूमीवर सहज हाताळता येऊ शकतील, अशा सहा बोटी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महानगरपालिकेला देण्यात आल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी मोरभवनमध्ये पाणी साचून परिसराला तलावाचे रूप आले होते. प्रवासी आपले जीव वाचवण्यासाठी बसवर चढले होते. तेव्हा याच बोटींचा वापर करण्यात आला होता. यासोबतच १ पोर्टेबल लायटिंग सिस्टिम, २ एअर मुव्हर, १० फुलफेस मास्क, ५० कार्टीज, १ काँक्रीट मेटल कर, ५ सॉरबंट्स, २ आग विझविणारे सिलेंडर, १ कॉम्बी रेस्कु टुलकीट,२ मल्टी गॅस डिटेक्टर, १० इमरजन्सी ब्रेसलेट, १५ हेड लॅम्प, ४ सर्च लाईट, १५ सेफ्टी हेलमेट आदी साहित्य प्रदान केले आहेत.(प्रतिनिधी)बलून्स लाईट आपत्कालीन परिस्थितीत रात्रीच्या वेळी स्वच्छ प्रकाश राहावा यासाठी पुरेसा प्रकाश देणाऱ्या लाईटची आवश्यकता भासते. यात बलून्स लाईट अतिशय चांगला प्रकाश देतात. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे असे दोन बलून्स लाईट महापालिकेला व दोन तहसील कार्यालयाला देण्यात आले आहे. विजेवर व जनरेटवरही हे लाईट चालतात. याला सुरू केल्यावर किमान १० फुट उंच बलून्स तयार होतो. त्याचा प्रकाश चारही बाजूंनी पसरतो. रात्रीच्या वेळी काम करण्यासाठी हे लाईट अतिशय उपयोगी पडतात. कळमना येथील कोल्ड स्टोअरेजची इमारत कोसळली होती तेव्हा इमारतीचा मलबा काढण्याचे काम दिवसरात्र सुरू होते. त्यावेळी याच बलून्स लाईटचा वापर करण्यात आला होता. रेल्वे अपघातांमध्ये या प्रकारच्या लाईटचा वापर केला जातो.बॅटरीवर चालणारे लाईट येणारबलुन्स लाईट मोठे आणि चारही बाजूंनी प्रकाश देणारे आहेत. परंतु ते हाताळताना अतिशय कठीण जातात. सोबत जनरेटरसुद्धा ठेवावे लागते. त्यामुळे आता बाजारात बॅटरीवर चालणारे चायना मेड लाईट आले आहेत. या लाईटचा प्रकाश चांगला असतो. हे लाईट चारही बाजूंनी प्रकाश देत नसले तरी ते हाताळणे सहज व सोपे आहेत त्यामुळे लवकरच हे लाईट सुद्धा मागवण्यात येणार आहेत.