शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कर्तव्यावरील महापालिकेच्या स्वास्थ्य अधिकाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 20:21 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला देणाऱ्या कर्तव्यावरील आरोग्य अधिकाऱ्याला एक महिला आणि तिच्या दोन भावांनी बेदम मारहाण केली.

ठळक मुद्देवायुसेना नगरातील संतापजनक घटना : महिलेसह तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला देणाऱ्या कर्तव्यावरील आरोग्य अधिकाऱ्याला एक महिला आणि तिच्या दोन भावांनी बेदम मारहाण केली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान ही संतापजनक घटना घडली. रीना पुरुषोत्­तम तिवारी (वय ३८, रा. सेमिनरी हिल्स), विनोद डमरकुमार शाही (वय ४२) आणि राजेश डमरकुमार शाही (वय ३७, रा. सुरेंद्रगड, नेपाली मोहल्ला, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.तक्रारदार संजय रूपलाल करिहार (वय ४७) हे इमामवाड्यात राहतात. ते महापालिकेचे स्वास्थ्य अधिकारी आहेत. शुक्रवारी सकाळी ते गिट्टीखदानमधील वायुसेना गेटसमोर आपले कर्तव्य बजावत होते. त्यांना रीना तिवारी ही महिला दोन लहान मुलांना घेऊन येताना दिसली. तिघांच्याही तोंडाला मास्क नव्हते आणि ते सुरक्षित अंतरही ठेवून नव्हते. सार्वजनिक ठिकाणी ते अशा बेफिकिरीने फिरत असल्याचे पाहून फिर्यादी संजय करिहार यांनी त्यांना आपली ओळख सांगितली. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी फिरणे चांगले नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लहान मुलांना घेऊन तुम्ही तोंडाला मास्क न बांधता का फिरत आहात, असा प्रश्न त्यांनी केला. यावरून तिवारी यांनी करिहार यांच्यासोबत वाद घातला. त्यामुळे पुरावा जवळ ठेवण्यासाठी करिहार यांनी रीना तिवारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन मुलांचा मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न केला. ते पाहून तिवारी यांनी त्यांना शिवीगाळ केली तसेच आरोपी विनोद शाही आणि राजेश शाहीला फोन करून घटनास्थळी बोलविले. हे दोघे तेथे पोहोचले आणि त्यानंतर तिघांनी करिहार यांना बेदम मारहाण केली. त्यांचे नाकही फोडले. करिहार यांच्या मदतीला अन्य सहकारी धावले. त्यामुळे ते कसेबसे बचावले. त्यानंतर शिवीगाळ करत आरोपी तिथून निघून गेले. करिहार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन गिट्टीखदान पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्यांच्यावर उपचार करून घेतले आणि आरोपी विनोद तसेच राजेश शाही या दोन भावांना शुक्रवारी सायंकाळी अटक केली. महिला असल्यामुळे त्यांना अटक करण्याचे शुक्रवारी सायंकाळी टाळण्यात आले. शनिवारी सकाळी रीना तिवारी यांनाही अटक करण्यात आली. या तिघांना आज न्यायालयात पाठविण्यात आले.प्राचार्य असूनही बेजबाबदारीचे वर्तनपोलिसांच्या माहितीनुसार, रीना तिवारी या एका कॉन्व्हेंटच्या प्राचार्य आहेत. मुलांना खबरदारीचे धडे देऊन त्यांना जबाबदार नागरिक बनविण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. मात्र अशा प्रकारचे वर्तन करून त्यांनी स्वत:च बेजबाबदारपणा दाखविला आहे.कोरोना योद्ध्यांमध्ये असंतोषनागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सारखा वाढत आहे. त्यामुळे अवघ्या नागपूरकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांना संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्यातीलच एकाने महिलेला सजग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरच महिला आणि तिच्या भावाने हल्ला केला. ही माहिती कळल्यामुळे कोरोना योद्ध्यांत असंतोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका