मनपा 'स्वच्छता ही सेवा' मोहीम राबविणार : महापौर नंदा जिचकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 10:55 PM2019-09-16T22:55:10+5:302019-09-16T22:56:40+5:30

नागपूर महानगरपालिकेद्वारे १८ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर यादरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम तीन टप्प्यात राबविली जाणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Municipal Corporation to launch 'Cleanliness Service' campaign: Mayor Nanda Jichkar | मनपा 'स्वच्छता ही सेवा' मोहीम राबविणार : महापौर नंदा जिचकार

मनपा 'स्वच्छता ही सेवा' मोहीम राबविणार : महापौर नंदा जिचकार

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा जनजागृती करणार : सर्व प्रभागात श्रमदान चळवळ राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे १८ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर यादरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम तीन टप्प्यात राबविली जाणार असल्याची माहिती महापौरनंदा जिचकार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
तत्पूर्वी महापौरांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त अभिजित बांगर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, नगरसेवक सुनील अग्रवाल, लता काडगाये, राजकुमार साहू, अमर बागडे, वंदना यंगटवार, माधुरी ठाकरे, अभिरुची राजगिरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अशोक पाटील, हरीश राऊत, गणेश राठोड, सुभाष जयदेव, आरोग्याधिकारी डॉ. सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार आदी उपस्थित होते.
स्वच्छता ही सेवा ही मोहीम तीन टप्प्यात राबविली जाणार आहे. १८ सप्टेंबरला मोहिमेची सुरुवात सर्व प्रभागापासून करण्यात येईल. सर्व प्रभागामध्ये स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीची जनजागृती करणारी रॅली आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभागामध्ये श्रमदान चळवळ करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौरांनी केले. उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना पुरस्कार दिला जाईल. गोळा केलेल्या प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे.
प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर उपद्रव शोध प्रतिबंधक पथकाद्वारे कारवाई केली जाईल. पहिल्यांदा गुन्हा केल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा आढळल्यास १० हजार व तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास २५ हजार रुपये दंड वसूल केला जाईल, असेही महापौरांनी सांगितले.
महापालिका मुख्यालय सर्वप्रथम प्लास्टिकमुक्त केले जाणार आहे. त्यानंतर सर्व झोन कार्यालये, मनपाचे दवाखााने, शाळा प्लास्टिकमुक्त केल्या जातील. कचरा विलगीकरणासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. कचरा संकलन करणाऱ्यांनी कचरा विलगीकरण न करता नेला तर त्यावर दंड आकारला जाईल, असा इशारा अभिजित बांगर यांनी दिला.
मंगल कार्यालये, हॉटेल्स किंवा घरगुती कचऱ्यातून निघणारे फूड वेस्ट हे वेगळे संकलित करण्याची व्यवस्था असावी, या वेस्टपासून बायोसीएनजी निर्माण करता येईल. कचरा जाळण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. कचरा जाळण्यावर उपद्रव शोध प्रतिबंधक पथकाने काय करावे, यासंदर्भात सूचना झोन सहायक आयुक्तांनी त्यांना द्याव्यात, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
बैठकीला जयंत पाठक, लीना बुधे, अनसूया छाब्राणी, ग्रीन व्हिजिलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल उपस्थित होते.

कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर
सर्व झोनमधील ज्या ठिकाणी कचरा जास्त जमा होतो, त्या ठिकाणांची यादी झोनल अधिकाऱ्यांनी सहायक आयुक्तांमार्फत सादर करावी. घरोघरी जाऊन कचरा संकलन करणारी यंत्रणा ज्या ठिकाणी कमकुवत आहे., त्या ठिकाणी ती सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली. ज्या ठिकाणी नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून किंवा उपद्रव शोध प्रतिबंधक पथकाकडून कारवाई के ली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

Web Title: Municipal Corporation to launch 'Cleanliness Service' campaign: Mayor Nanda Jichkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.