शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचकेंना अटक; छत्तीसगड पोलिसांची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2023 22:13 IST

‘हनिट्रॅप’ प्रकरणाची तक्रार करणारे व चौकशीनंतर स्वत:च महिलेशी अश्लिल चॅटिंग करताना आढळलेले नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना अटक करण्यात आली आहे.

नागपूर : ‘हनिट्रॅप’ प्रकरणाची तक्रार करणारे व चौकशीनंतर स्वत:च महिलेशी अश्लिल चॅटिंग करताना आढळलेले नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड येथील राजनांदगाव कोतवाली ठाण्याच्या पथकाने त्यांना अटक केली असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

नागपुरातील उच्चशिक्षित तरुणीची छत्तीसगडमधील अमित सोनीशी फेसबुकवरून ओळख झाली व दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. २०२१ मध्ये दोघांनीही लग्न केले. उचके व तरुणीची अगोदरपासूनच ओळख होती. दोघांमध्ये संवाददेखील होत होता. मात्र १७ जून २०२२ पासून उचकेने अश्लील चॅटिंग करण्यास सुरुवात केली. सोबतच स्वत:चे अश्लील व्हिडीओ, पॉर्न व्हिडीओ व ऑडिओदेखील पाठविले. तक्रारीनुसार उचकेने तिला शारीरिक संबंध बनविण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यावरून तरुणीने त्याला जाब विचारला असता त्याने तिला अधिकारी असल्याचे सांगत कुटुंबीयांसह जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकारामुळे प्रचंड मन:स्ताप होत असून आत्महत्येचे विचार मनात येत असल्याने तरुणीने राजनांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर उचके यांच्याविरोधात नोव्हेेंबर २०२२ मध्ये कलम ५०६ (ब), ५०९ (ब) व आयटी ॲक्ट ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राजनांदगाव येथील पोलीस पथकाने तीन दिवसांअगोदर उचके यांना अटक केली. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भोला सिंह राजपूत यांच्या नेतृत्वातील पथकाने नागपुरात येऊन ही कारवाई केली. याबाबत राजपूत यांना ‘लोकमत’ने विचारणा केली असता त्यांनी अटक झाली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी