शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'मम्मी-पापा यू टू' अभियान : आई-बाबा लागा तुम्ही स्वच्छतेच्या कामाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 23:55 IST

‘आई-बाबा सांगत्ये मी तुम्हाला, लागा तुम्ही नागपूर स्वच्छतेच्या कामाला’ अशा एकापेक्षा एक घोषवाक्याची निर्मिती नागपूर शहरातील विद्यार्थ्यांनी करून आपल्यातील कल्पकतेचा आणि जागरूकतेचा परिचय दिला.

ठळक मुद्दे१ लाख १५ हजार विद्यार्थ्यांचा घोषवाक्य स्पर्धेत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कदम कदम से कदम और हाथ में हाथ मिलाना है, नागपुर को सबसे श्रेष्ठ और सुंदर बनाना है’, ‘उरलेले अन्न जमा करीन डब्यात, कचऱ्याची गाडी आली टाकीन हिरव्या डब्यात’, ‘आई-बाबा सांगत्ये मी तुम्हाला, लागा तुम्ही नागपूर स्वच्छतेच्या कामाला’ अशा एकापेक्षा एक घोषवाक्याची निर्मिती नागपूर शहरातील विद्यार्थ्यांनी करून आपल्यातील कल्पकतेचा आणि जागरूकतेचा परिचय दिला.निमित्त होते महापालिका, शालेय शिक्षण विभाग आणि पोलीस वाहतूक विभागाच्या वतीने आयोजित ‘मम्मी पापा यू टू’ अभियानाचे. १३ ते १९ जानेवारीदरम्यान राबविण्यात येत असलेल्या अभियानाच्या पहिल्या दिवशी सोमवारी नागपूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शहरातील मनपा शाळांसह एकूण ९२६ शाळांतील १ लाख १५ हजार ५३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत एकापेक्षा एक सरस घोषवाक्यांची निर्मिती केली. हीच घोषवाक्ये घेऊन शहरातील सर्व शाळांतील विद्यार्थी १७ जानेवारीला सकाळी ८.३० वाजता मानवी साखळी तयार करणार आहे. स्वच्छता आणि वाहतूक नियम पाळण्यासंदर्भात जनजागृती करणार आहेत.सोमवारी घोषवाक्य स्पर्धा शाळास्तरावर दोन गटात घेण्यात आली. यामध्ये ५ ते ८ एक गट आणि ९ ते १२ वी दुसºया गटाचा समावेश आहे. या स्पर्धेतून प्रत्येक शाळेतील एक उत्कृष्ट घोषवाक्य निवडण्यात येईल. यानंतर ३० केंद्रांवरून केंद्रस्तरावर प्रत्येकी एका केंद्रातून एक असे ३० घोषवाक्य निवडण्यात येतील. त्यातून उत्कृष्ट ३ आणि १० उत्तेजनार्थ बक्षिसासाठी घोषवाक्यांची निवड महापालिकास्तरावर केली जाईल.घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय पाच हजार रुपये तर तृतीय तीन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. प्रत्येकी एक हजार रुपयांचे दहा उत्तेजनार्थ पारितोषिकही देण्यात येईल. सोमवारी पार पडलेल्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांत उत्साह होता.महापौर, आयुक्तांनी केले कौतुकएखाद्या चांगल्या उद्देशासाठी नागपूर शहरातील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘मम्मी पापा यू टू’ अभियानाच्या निमित्ताने मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पहिल्याच स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापौर संदीप जोशी आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्वांचे अभिनंदन करीत कौतुक केले आहे.आज पथनाट्य स्पर्धामम्मी पापा यू टू अभियानांतर्गत आज मंगळवारी पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्रथम शाळास्तरावर होईल. यातून के’द्रस्तरावर उत्कृष्ट पथनाट्यांची निवड करून पाठविण्यात येईल. त्यातून उत्कृष्ट पथनाट्यांची निवड शाळास्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाStudentविद्यार्थी