शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नागपूर महामार्गाने राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटीशी जोडणार- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 03:01 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा जगातील सर्वोत्कृष्ट महामार्ग बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान या महामार्गासाठी वापरले जात आहे.

नागपूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा जगातील सर्वोत्कृष्ट महामार्ग बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान या महामार्गासाठी वापरले जात आहे. या महामार्गाने २२ नोड्सच्या माध्यमातून २४ जिल्हे जेएनपीटीशी जोडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.इंडियन रोड काँग्रेसचे औपचारिक उद्घाटन करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भौतिक आणि व्हर्च्युअल गोष्टींना जोडून भविष्यात रस्ते व पुलांची निर्मिती शक्य आहे. मात्र, स्मार्ट, सस्टेनेबल आणि सेफ हा त्या पुलांच्या निर्मितीचा आधार असावा. आपण तंत्रज्ञानाचा जेवढा वापर करू तेवढे उत्कृष्टतेचे निकष पूर्ण करू शकू. प्रकल्पांचा डीपीआर तयार करताना तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपल्याला खऱ्या अर्थाने अचूक डीपीआर तयार करता येईल. त्यामुळे डीपीआर निर्मितीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्याचा आग्रहही त्यांनी केला. तसेच या अधिवेशनात ज्या १५ कोडचे उद्घाटन झाले, त्या सर्वांचा एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तयार करून डीपीआर निर्मितीमध्ये या कोडचा व नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश व्हावा. तसेच आधुनिक, अद्ययावत, शाश्वत, स्वयंपूर्ण व सुरक्षित रस्ते बांधणीवर भर देण्याचे आव्हान बांधकाम क्षेत्रातील अभियंत्यांनी स्वीकारावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.ज्ञानाचे समृद्धीत रूपांतरण हेच भविष्य असून आमच्या सरकारने पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले आहे. विज्ञान, संशोधन, व्यावसायिकता, कौशल्ये या गोष्टींवर भर देण्याचा सल्लाही या वेळी गडकरी यांनी दिला. सोबतच पायाभूत सुविधांचा खर्च कमी करण्यावर भर देताना गुणवत्ताही कायम ठेवणे आवश्यक असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.रस्ते सुरक्षेसंंबंधी संवेदनशीलता हवी - गडकरीभारतात रस्ते अपघातात मृत पावणाºयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. शिवाय तीन लाख लोकांना रस्ते अपघातात अपंगत्व येते. याचा दोष केवळ नशिबाला देता कामा नये. कारण अनेक घटना या रस्ते अभियांत्रिकीमधील चुकांमुळे होतात. चुकीचा डीपीआरही याला जबाबदार आहे. त्या अनुषंगाने रस्तेनिर्मिती व बांधणीतील सर्व संबंधित विभागांनी संवेदनशील असावे. या संवेदनशीलतेमुळे अनेक जीव वाचवता येतील, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर