शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

-तर मुंबई घटनेसारखी नागपुरातही पुनरावृत्ती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 10:15 IST

मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर १५७ जण जखमी झाले. नागपूरच्या सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयातही या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकामगार रुग्णालयाची इमारत धोकादायकदुसऱ्या मजल्यावर गाद्या व रद्दीचा खच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर १५७ जण जखमी झाले. नागपूरच्या सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयातही या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.या रुग्णालयातही ये-जा करण्यासाठी एकच मार्ग आहे. ‘रॅम्प’ नाहीत. अरुंद पायऱ्या आहेत. रुग्णालयाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दुसऱ्या मजल्यावर मोठ्या संख्येत गाद्या, रद्दी पेपर, फाईल्सचा ढीग व भंगार साहित्य पडून आहेत. येथील विद्युत व्यवस्थाही योग्य पद्धतीची नाही. आग विझवण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही. रुग्णालयात समाजविघातकांचा वावर असल्याने मोठ्या धोक्याची शक्यता वर्तवली जात आहे.अग्निशमन विभागाच्या रुग्णालयांसाठी अग्निशमन यंत्रणा लावण्याबाबत स्पष्ट सूचना आहेत. कायद्यानुसार १५ मीटरपेक्षा उंच व ५० खाटांच्या रुग्णालयामध्ये ‘आॅटोमॅटिक हिट डिटेक्टर’, ‘हॉजव्हील’, ‘फायर अलार्म सिस्टीम’, ‘वेटराईजर’, भूमिगत पाण्याची टाकी असणे आवश्यक आहे. आपत्कालीन स्थितीत उपचार घेणाºया रुग्णांना कमीत कमी वेळेत इमारतीतून बाहेर काढता यावे यासाठी विशेष उपाययोजना क्रमप्राप्त आहे. परंतु दोन मजल्याच्या कामगार रुग्णालयात अशी कोणतीच व्यवस्था नाही. प्रत्येक माळ्यावर एक-एक व तळमजल्यावर दोन ते चार अग्निशमन उपकरण बसवून अग्निशमन विभागाच्या अटींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.कुणीही या-कुणीही जा‘लोकमत’ प्रतिनिधीने मुंबई घटनेच्या धर्तीवर या रुग्णालयाची पाहणी केली असता आगीसारख्या घटनेसाठी तातडीने विविध उपाययोजना करण्याची गरज असल्याचे दिसून आले. कामगार रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दुसऱ्या मजल्यावरील वॉर्ड क्र. पाच व सहामध्ये भंगार साहित्य पडून आहे. विशेषत: मोठ्या संख्येत गाद्यांचा ढीग, रद्दी कागद, फाईल्सचा खच पडला आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक राहत नसल्याने कुणीही ये-जा करू शकतात. समाजविघातकांचा रुग्णालयात वावर असल्याचेही दिसून आले. अशावेळी दुसऱ्या मजल्यावरील गाद्यांना कुणी आग लावल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

अरुंद पायऱ्या व खिडक्यांवर काचेचे तावदानरुग्णालयात १३० खाटांची सोय आहे. पहिल्या मजल्यावरील वॉर्डात रुग्णांना ठेवले जाते. परंतु येथे जाण्यासाठी एकमेव पायऱ्यांचा अरुंद मार्ग आहे. येथे ‘रॅम्प’ नाहीत. पायऱ्यांच्या मार्गावरील खिडक्यांना काचेचे तावदान लावून बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे आकस्मिक घटनेत रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविणे अडचणीचे आहे. शिवाय, धूर कोंडण्याचीही शक्यता आहे.एकच प्रवेशद्वारमुंबईप्रमाणे या रुग्णालयातही एकच प्रवेशद्वार आहे. मागील भागात एक दार आहे. परंतु ते नेहमी कुलूपबंद असते. रुग्णालयात मोजकीच अग्निशमन उपकरणे आहेत. त्याचे प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना देण्यात आले नसल्याचे समजते.

टॅग्स :Accidentअपघात