मुंबई-हटिया, एलटीटी-संत्रागाछी विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:34+5:302021-06-05T04:07:34+5:30

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ०२४०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी नागपूर मार्गे (६ फेऱ्या) १३, २०, ...

Mumbai-Hatia, LTT-Santragachi special trains | मुंबई-हटिया, एलटीटी-संत्रागाछी विशेष रेल्वेगाड्या

मुंबई-हटिया, एलटीटी-संत्रागाछी विशेष रेल्वेगाड्या

Next

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ०२४०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी नागपूर मार्गे (६ फेऱ्या) १३, २०, २७ जूनला सकाळी ११.०५ वाजता सुटून हटियाला दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२४०६ हटिया-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ११, १८, २५ जूनला हटियावरून सायंकाळी ५.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला रात्री ११ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यांत १६ स्लिपर आणि ४ द्वितीय श्रेणी कोच राहतील. तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०२४९७ लोकमान्य टिळक टर्मिनस-संत्रागाछी साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडी ११, १८, २५ जूनला दुपारी १.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी संत्रागाछीला सायंकाळी ६.३५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२४९८ संत्रागाछी-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडी ९, १६, २३ जूनला संत्रागाछीवरून सायंकाळी सहा वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. दोन्ही रेल्वेगाड्यांना कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपुर, टाटानगर, खडगपूर येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यांत १६ स्लिपर आणि ४ द्वितीय श्रेणी कोच राहतील.

..................

Web Title: Mumbai-Hatia, LTT-Santragachi special trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.