महावितरणचा निर्णय : आता सब स्टेशनची कमान खासगी हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:45 PM2020-05-19T22:45:25+5:302020-05-19T23:41:07+5:30

नागपूर झोनमधील ९ सब स्टेशनसह प्रदेशातील ९१ सब स्टेशन खासगी हातात सोपविण्याचा निर्णय वीज वितरण कंपनी महावितरणने घेतला आहे. कंपनीने १ एप्रिल २०१९ पासून ११ डिसेंबर २०१९ पर्यंत तयार सब स्टेशनचा या यादीत समावेश आहे. कामगार संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवून आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. टप्प्याटप्प्याने सर्व सब स्टेशनचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचा दावा संघटनांनी केला आहे.

MSEDCL's decision: Now the arch of the sub station is in private hands | महावितरणचा निर्णय : आता सब स्टेशनची कमान खासगी हातात

महावितरणचा निर्णय : आता सब स्टेशनची कमान खासगी हातात

Next
ठळक मुद्देकामगार संघटनांचा तीव्र विरोधप्रदेशातील ९१ सब स्टेशन जाणार ताब्यात, नागपूरच्या ९ सब स्टेशनचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर झोनमधील ९ सब स्टेशनसह प्रदेशातील ९१ सब स्टेशन खासगी हातात सोपविण्याचा निर्णय वीज वितरण कंपनी महावितरणने घेतला आहे. कंपनीने १ एप्रिल २०१९ पासून ११ डिसेंबर २०१९ पर्यंत तयार सब स्टेशनचा या यादीत समावेश आहे. कामगार संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवून आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. टप्प्याटप्प्याने सर्व सब स्टेशनचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचा दावा संघटनांनी केला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान हा आदेश जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार १ एप्रिल २०१९ च्या नंतर तयार झालेल्या सर्व सब स्टेशनचे कामकाज निविदा मिळविणाऱ्या एजन्सी मार्फत करण्यात येणार आहे. यामुळे महावितरण आता ऑपरेटरच्या पदांवर स्थायी नियुक्ती करणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. महावितरणच्या संचालक मंडळाच्या मते, ‘सब स्टेशनमध्ये एक वरिष्ठ ऑपरेटर आणि तीन सहायक ऑपरेटर असतात. आता त्यांची नियुक्ती आऊटसोर्सिंग एजन्सीच्या मार्फत होणार आहे.’ सूत्रांच्या मते या एजन्सीला नियुक्त करण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येईल. या सब स्टेशनच्या देखभालीची जबाबदारी सहायक अभियंता यांना सोपविण्यात आली आहे. त्यांच्या मते वितरण व्यवस्थेचा आत्मा समजल्या जाणाऱ्या या सब स्टेशनला तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. महावितरण या सब स्टेशनवर कोट्यवधी रुपये खर्चून ते खाजगी हातात सोपविणार आहे.

लॉकडाऊनमध्ये आंदोलन
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने या निर्णयाचा तीव्र विरोध करून लॉकडाऊनमध्ये गुरुवारी वीज कर्मचारी या निर्णयाविरुद्ध आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. आर्थिक संकट पाहून कंपनी कपात करण्याचा प्रयत्न करीत असून वितरण व्यवस्था खासगी हातात सोपविण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल असल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी व्यक्त केले आहे.

विदर्भात सर्वाधिक नागपुरात
विदर्भात नागपूर झोनमधील सर्वाधिक ९ सब स्टेशनचे खासगीकरण करण्याची तयारी करण्यात आली आहे. यात कारला चौक, एकलापूर, पिंपळगाव रोड, गंगापूर, मोहगाव, कवडस, शिवणगाव पुनर्वसन, चिखलापूर, बेला सब स्टेशनचा समावेश आहे. याशिवाय चंद्रपूर झोनमध्ये ८, अमरावतीत ३, गोंदियात ७ आणि अकोल्याच्या ६ सब स्टेशनचा समावेश आहे.

Web Title: MSEDCL's decision: Now the arch of the sub station is in private hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.